Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नाद नाही! स्ट्रॉबेरीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न, असं केलं नियोजन

यशोगाथा

Success Story । तरुणवर्ग शेतीकडे वळू लागला आहे. आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत तरुण शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ज्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही उच्च शिक्षित तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. तर काहीजण नोकरी करत करत शेती करत आहेत.

Onion Exprot Ban । धक्कादायक! कांद्यामुळे रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, नेमकं प्रकरण काय?

अशाच एका उच्च शिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी शेतीतून (Strawberry farming) लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्याकडे केवळ 10 गुंठे जमीन होती. त्याने त्यात नियोजन करून भरघोस उत्पन्न मिळवून दाखवले आहे. बालाजी उपवार (Balaji Upwar) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते नांदेडमधील बारड गावात राहतात. त्यांनी बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. (Strawberry farming information)

PM Kisan Yojana । वडील आणि मुलालाही घेता येणार PM किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम? जाणून घ्या

10 गुंठ्यांमध्ये केली स्ट्रॉबेरीची लागवड

पारंपरिक शेतीला फाटा देत या शेतकऱ्याने 10 गुंठ्यांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड (Cultivation of strawberries) करण्याचा निर्णय घेतला. बालाजी उपवार यांनी यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीसारखे पीक घेतले आहे. लागवडीसाठी त्यांनी महाबळेश्वरवरून रोपे आणले होते. त्यांनी नाभिला जातीची 4000 कलमे आणून लागवड केली होती. लागवड करताना त्यांनी सेंद्रीय पद्धतीचा वापर केला.

Havaman Andaj । येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

ठिबक आणि मलचिंग पेपरचा वापर

इतकेच नाही तर त्यांनी ठिबक आणि मलचिंग पेपरचा वापर लागवड करताना केला आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीतनंतर त्यांची स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्ट्रॉबेरी थेट बाजारात न विकता त्यांनी ‘शेतकरी ते ग्राहक’ या तत्वाचा अवलंब करत थेट शेतापुढेच स्टाॅल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत.

Success Story । नाद नाही करायचा..1 एकर आल्यातून शेतकऱ्याने कमावले 10 लाख रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

त्यातून त्यांना चांगला फायदा होत आहे. त्यांच्या स्ट्रॉबेरीला प्रतिकिलो 300 रुपये या प्रमाणे दर मिळत आहे. थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील त्यांची स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. त्यांना स्ट्रॉबेरीच्या लागवड खर्च दीड लाख रूपये आला असून ते रोज 30 किलो स्ट्रॉबेरी रोज विक्री करतात.

Government Schemes । मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *