Success story

Success story । व्वा रे पठ्ठया! कपाशीला फाटा देत केली तुरीची लागवड, आज कमावतोय लाखो रुपये; कसे ते जाणून घ्या

यशोगाथा

Success story । हल्ली उच्च शिक्षित तरुणवर्ग देखील शेती करू लागला आहे. युवा शेतकरी सतत शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. शेतकरी पूर्वी फक्त पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत होते. पण आता शेतकरी आधुनिक पिकांचे (Modern crops) उत्पादन घेऊ लागले आहेत. आधुनिक पिकांच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत.

Milk Rate । पशुपालकांना मोठा धक्का! दुधाच्या दरात पुन्हा घसरण

कपाशीला फाटा देत केली तुरीची लागवड

अशाच एका तरुण शेतकऱ्याने कपाशीला फाटा देत तुरीची लागवड (Cultivation of tur) करून लाखो रुपयांची कमाई केलीय. हा शेतकरी छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील रहिवासी आहे. त्यांचे नाव अक्षय झाल्टे (Akshay Zalte) असे आहे. अक्षय झाल्टे यांनी बीएसस्सी ऍग्रीचे शिक्षण घेतले आहे. पूर्वी ते फक्त पारंपरिक ऊस, कांदा, कपाशी, मका अशी पिके घ्यायची. (Cultivation of tur information)

Crop Insurance । मोठी बातमी! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पीकविमा परतावा

तूर अवघी एक दोन एकर होती. त्यांना वडिलोपार्जित ३५-४० एकर शेती आहे. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि परभणी कृषी विद्यापीठ तसेच बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे बियाणे वाटप केंद्र छत्रपती संभाजीनगर यांना वेळोवेळी भेटी दिल्या. याच भेटीदरम्यान, त्यांना बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे संशोधित तूर वाण असणाऱ्या BDN 711 या तूरीविषयी माहिती मिळाली.

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

अशी केली सुरुवात

कपाशीतून अपेक्षित खर्च निघत नसल्याने त्यांनी २०१९ मध्ये प्रयोग म्हणून सात एकर तुरीची लागवड केली. उत्पन्न चांगले मिळाले आणि त्यांना खर्चही कमी आला. त्यामुळे त्यांनी २०२०, २०२१ आणि २०२२ मधील पिकांतून मिळणाऱ्या अनुभवातून शिकत सध्या अक्षय हे तुरीत प्रगत झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

Potato Price । बापरे! अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित

दरम्यान, झाल्टे यांनी या वर्षी साडे पाच एकर क्षेत्रावर तुरीची लागवड केली होती. लागवडीसाठी ६ बाय २ या पद्धतीचा वापर करून लागवडीनंतर ४५ दिवसांनी शेंड्यांची छाटणी करून किटकनाशक, बुरशीनाशक तसेच सुष्म अन्नद्रवांची फवारणी घेतली. जनावरांना चांगले भुस मिळावे म्हणून मजुराच्या मदतीने तुरीची पारंपरिक पद्धतीने काढणी केली. त्यांना साडेपाच एकरात सरासरी एक लाख रुपये खर्च आला असून ६४ क्विंटलचे उत्पादन त्यांना झाले.

Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *