Success Story

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

यशोगाथा

Success Story । इंदापूर : आजची तरुण पिढी शेतीचे महत्त्व जाणून शेतीकडे वळू लागली आहे. विशेष म्हणजे काही तरुण गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी सोडून शेती करू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. सफरचंद, ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांची लागवड योग्य प्रकारे नियोजन करून केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असणाऱ्या कचरवाडी या गावातील अमर पांडुरंग बरळ या तरुण शेतकऱ्याने सफरचंद, ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकाची लागवड न करता पॅशन फ्रुट या फळाची लागवड केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात पहिल्यांदाच या फळाचा प्रयोग करण्यात आला आहे. या फळाच्या सक्सेसफुल लागवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अशी केली लागवड

अमर पांडुरंग बरळ या युवा शेतकऱ्याने लागवडीसाठी राजस्थान व मध्य प्रदेश सीमेवर असणाऱ्या किसन गड या ठिकाणावरून बियाणे आणले होते. त्याची नैसर्गिक रोपे तयार करून पाऊण एकर क्षेत्रात एकूण शंभर रोपांची लागवड केली. दोन ओळीतील अंतर 10 आणि रोपातील अंतर सात फूट ठेवून बांबूंच्या आधाराने पॅशन फ्रुटची यशस्वी लागवड त्यांनी केली.

विक्री

सुरुवातीला या फळाची विक्री पुण्यात केली जाणार होती. परंतु आता जास्त उत्पादन मिळत असल्याने ते अमेझॉन, बिग बास्केट आणि रिलायन्स या प्लॅटफॉर्मवर विक्री केली जाणार असून त्यासाठी या फळाचे नमुने देऊन दर निश्चित केले जातील.

खर्च

या फळाच्या लागवडीकरिता स्टेजिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. स्टेजिंगसाठी त्यांना तीन लाख रुपयांचा खर्च आला. महत्त्वाचे म्हणजे एकदा स्टेजिंग केल्यास पुढील दहा ते बारा वर्षापर्यंत स्टेजिंगसाठी पैसे खर्चावे लागत नाही. पिकातून साडेतीन टन माल निघू शकतो अशी अपेक्षा त्यांना आहे. तर विक्रीतून एकूण चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरोग्यासाठी फायदेशीर

पॅशन फ्रुटबद्दल सांगायचे झाले तर अनेक आजारांवर हे फळ खूप फायदेशीर आहे. यात मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असलेले वेगवेगळे गुणधर्म लपलेले आहेत. हृदयासाठी, डेंगू,पांढऱ्या पेशी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.हे वेलवर्गीय फळ असल्याने त्याला कोणत्याही औषधाची गरज भासत नाही.

जर तुम्ही या फळासाठी शेणखताचा वापर केला तर उत्पादन चांगले मिळते. शिवाय या फळाला कोणताही रोग होत नाही. केवळ माशांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. माशांसाठी या शेतकऱ्याने ट्रॅप लावून नियंत्रण ठेवले आहे. विशेष म्हणजे हे फळ शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने पिकवले जात असून लवकरच त्याच्या काढणीला होईल. मेट्रो सिटीमध्ये या फळाला सर्वात जास्त मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *