Success story

Success story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! YouTube च्या मदतीने वाळवंटात केली गुलाबी पेरुची बाग

यशोगाथा

Success story । अनेकजण पारंपरिक शेती करतात. परंतु त्यातून मोजकेच पैसे हाती येतात. महत्त्वाचे म्हणजे त्याला दिवसरात्र मेहनत करावी लागते. प्रत्येक वर्षी या पिकांना चांगले उत्पन्न मिळतेच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना बाजारभाव न मिळाल्याने पिके फेकून द्यावी लागतात. काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. यात चांगला नफा मिळतो.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे, IMDने जारी केला अलर्ट

राजस्थानमधील नागौरच्या खिनवसार भागात राहणाऱ्या लिखमाराम मेघवाल या शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने वालुकामय जमिनीत तैवानच्या गुलाबी पेरुची (Taiwani Pink Guavas) लागवड केली आहे. विशेष म्हणजे खिनवसार हा वालुकामय परिसर असल्याने या ठिकाणी शेती करता येत नाही. येथे वेगवेगळे प्रकारची माती आढळते. येथील शेतकरी फुले, फळे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करतात. परंतु, शेतकरी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. वाळवंटात आता आंबा, भाजीपाल्यासारखी पिके येऊ लागली आहेत.

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

असे केले नियोजन

लिहमाराम मेघवाल यांनी 2020 मध्ये लखनौहून तैवान गुलाबी पेरूची लागवड (Taiwani Guavas) केली होती. या एका रोपाची किंमत 140 रुपये होती. त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करुन झाडे लावली. तसेच त्यांनी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. लॉकडाऊनमध्ये यूट्यूबचीही त्यांना खूप मदत झाली. सुरुवातीला त्यांनी 200 रोपे लावली होती, त्यापैकी 150 रोपे जगली. या झाडांपासून पहिले उत्पादन प्रति रोप 3 किलो पेरु होते. (Taiwani Guavas Cultivation)

Onion Rate । आज कुठल्या मार्केटमध्ये कांद्याने खाल्ला भाव; जाणून घ्या

दरम्यान, त्यांनी एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचे अंतर ते 5 बाय 6 नुसार ठेवले आहे. असे केल्याने झाडांची वाढ झाली की एकमेकांना भिडत नाहीत. मागील वर्षी या पेरू पिकातून त्यांनी प्रति रोप 3 किलो उत्पादन घेतले. यंदाच्या वर्षी प्रति रोप 10 किलो उत्पादन होऊ शकते.

Pomegranate Rate । युवा शेतकऱ्याच्या कष्टाचं झालं सोनं! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर; कमावले लाखो रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *