Success Story

Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये

यशोगाथा

Success Story । तरुणवर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे अनेक तरुण गलेगठ्ठ असणाऱ्या पगाराची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता पारंपरिक पिकांची लागवड न करता आधुनिक पिकांची लागवड केली जात आहे. आधुनिक पिकांना बाजारात चांगली मागणी असते. केशर हे जम्मू काश्मीरमध्ये पिकवले जाते. परंतु आता त्याचे भारतात देखील लागवड केली जात आहे.

Milk Rate । दूध दरावरून रयत क्रांती संघटनेने घेतली आक्रमक भूमिका, विखे-पाटील यांच्या घरासमोर करणार आंदोलन

एका उच्चशिक्षित दाम्पत्याने केशरमधून (Saffron cultivation) तब्बल 8 लाख रुपये मिळवले (Farmer Success Story) आहेत. विशेष म्हणजे त्यांना ही कमाई अवघ्या ५ महिन्यात करता आली आहे. दिव्या आणि अक्षय असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते नागपूर येथील रहिवासी आहेत. अक्षय यांचा व्यवसाय असून दिव्या बँकेत अधिकारी आहेत. दोघांचाही शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांना शेतीबद्दल खूप माहिती आहे. आपण देखील शेतीत अनोखा प्रयोग करावा, अशी त्यांची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती.

PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होतील ‘इतके’ पैसे

अशी केली सुरुवात

त्यांनी हळूहळू इंटरनेटच्या मदतीने केशरची माहिती (Saffron cultivation information) मिळवली. यासाठी त्यांनी दीड ते दोन वर्ष केशर शेतीचा अभ्यास करून चार बाय चारच्या एका बंद खोलीत केशरची शेती केली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनी केशर लागवडीसाठी जम्मू काश्मीरमधील पंपोर जिल्ह्यातून केशरचे बियाणे आणले. याचे बियाणे एकदा लावले की त्यापासून सलग पाच ते सात वर्षे रोपे तयार होतात.

Havaman Andaj । ऐन थंडीत अवकाळी पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

पाच महिन्यात घेतले उत्पादन

त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. पाच महिन्यात उत्पादन घेतले. त्यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये अर्धा किलो उत्पादन घेतले आहे. यात त्यांना आणखी दीड ते दोन किलो केशरचे उत्पादन मिळू शकते. त्यातून त्यांना आठ लाख रुपये सहज मिळतील. नागपूर सारख्या उष्ण परिसरात केशरचे उत्पन्न घेतल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Maharashtra Drought । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *