Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

यशोगाथा

Success Story । मिरची हा स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा पदार्थ. मिरचीशिवाय भाज्यांना चव येत नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर मिरीचीचे उत्पादन घेतले जाते. मागणी जास्त असल्याने क्वचितच मिरचीचे दर (Chilli rates) घसरलेले असतात. फक्त हिरवी नाही तर लाल मिरचीला देखील बाजारात चांगली मागणी असते. या मिरचीचा (Chilli) वापर प्रामुख्याने जेवणातील तडक्यासाठी केला जातो.

Crop Insurance । शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील शेतकऱ्याने या मिरचीची लागवड (Red Chilli Cultivation) करून चांगले उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे त्याने फक्त एक एकर लाल मिरीचीची (Red Chilli) लागवड केली होती. त्यातून त्याला तब्बल ३ लाख रुपयांचा लाभ झाला आहे. लक्ष्मण जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सफियाबापूरवाडी येथे राहतात. त्यांच्याकडे एकूण ६ एकर शेती आहे.

Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार बंद लासलगाव बाजार समिती, नेमकं कारण काय?

त्यात त्यांनी यावर्षी आले, कपाशी, आद्रक, मका आणि कांद्याचे पीक घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी विविध कृषी प्रदर्शन आणि कृषी विषयक माहिती घेऊन लाल मिरचीची लागवड (Red paprika) केली आहे. २०२१ साली लागवड करण्यास सुरुवात केलेल्या मिरीची या पिकातून त्यांनी लाखोंची कमाई केली आहे. इतकेच नाही तर त्यांचे मार्गदर्शन घेऊन परिसरातील इतर शेतकरीदेखील मिरचीची लागवड करत आहेत.

Havaman Andaj । राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

अशी केली सुरुवात

जाधव यांनी खासगी कंपनी सोबत बियाणे खरेदी ते मिरची विक्री कराराद्वारे रेड पेपरिका मिरचीचे बियाणे विकत घेऊन स्थानिक शेडनेट नर्सरीत रोपे निर्माण करून लागवड केली. एक एकर १८००० रोपे मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. त्यांनी ४.६ × ०.६ या अंतरावर मिरचीची लागवड केली आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत पीक येते. लाल मिरची कंपनीकडून ठरलेल्या दरानुसार खरेदी करण्यात येते.

Crop Insurance । आधार लिंक नसेल तर तुम्हालाही मिळणार नाही पिकविमा भरपाई, जाणून घ्या महत्त्वाचा नियम

खर्च आणि उत्पन्न

लागवड ते काढणीसाठी जाधव यांना ८० हजार खर्च आला. यात बियाण्यांपासून ठिबक सिंचन असा खर्च समाविष्ट आहे. दर्जाच्या मिरचीस २९५ किलो आणि दुय्यम दर्जाच्या मिरचीस २७० रुपये किलो दर मिळतो. खर्च सोडून जाधव यांना एकरी २.५ ते ३ लाख रुपये मिळाले आहेत.

Sarpanch Salary । तुमच्या गावातल्या सरपंच आणि उपसरपंचाला किती पगार असतो? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *