Success Story । मनात जर जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नसते. जिद्दीच्या जोरावर कितीही कठीण परिस्थितीवर सहज मात करता येते. देशात अनेकजणांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर होतो. शेतकरी आता आधुनिक शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने एक एकर आल्यातून तब्बल 12 लाख रुपयांची कमाई केली आहे.
Havaman Andaj । सावधान! हवामान खात्याने दिली पावसाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या
प्रत्येक वर्षी अपेक्षित असा पाऊस पडतोच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते. भोकरदन तालुक्यातील एकेफळ येथे राहणाऱ्या शिवाजी बोचरे या शेतकऱ्याने योग्य त्या नियोजनाने एक एकर क्षेत्रातून आल्याची लागवड (Ginger Cultivation) केली आहे. खर्चाचा विचार केला तर त्यांना पाणी, खते, मशागतीसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. क्विंटलला आठ हजार रुपयांचा दर मिळत आहे. (Ginger Farming)
Black Austrolorp । कडकनाथ नाही तर ‘ही’ कोंबडी मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न, आजच करा पालन
बोचरे यांनी एक एकरमधून 156 क्विंटल आल्याचे उत्पादन घेतले आहे. त्यातून त्यांना तब्बल 12 लाख रुपये मिळाले आहेत. खर्च सोडून त्यांना 10 लाखांचा नफा झाला आहे. कमी पाण्यावर योग्य त्या पद्धतीने नियोजन करीत मशागत करून दुष्काळी परिस्थिती अल्पभूधारक शेतकऱ्याने चांगले उत्पादन मिळवत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
“मनात जर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर आपण सहज मात करू शकतो. जर पाण्याचे योग्य नियोजन, कमी खर्च असेल तर भरघोस उत्पन्न मिळते. यावर्षी मी एक एकरात आल्याची लागवड केली होती. त्यातून मला 12 लाखांचे उत्पन्न घेता आले आहे. इतर शेतकऱ्यांनाही चांगले उत्पादन मिळू शकते,” अशी प्रतिक्रिया बोचरे यांनी दिली आहे.