Subsidy for Well । केंद्र आणि राज्य सरकारदेखील (State Govt) सतत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना सुरु करत असते. सध्या अनेक योजनांचा लाभ लाखो शेतकरी घेत आहेत. दरम्यान, काही योजना (Government Schemes for Agriculture) अशाही आहेत ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते, त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. समजा तुम्हाला नवीन विहीर खोदायची (Well Subsidy) असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका, बातमी तुमच्या फायद्याची आहे.
Drought in Maharashtra । भीषण वास्तव! तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळ, अवकाळीची मदत
शेतकऱ्यांना आता सरकारकडून नवीन विहीर खोदण्यासाठी चार लाखांपर्यंतचे अनुदान (Government Scheme) दिले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अनुदानासाठी निधी उपलब्ध असूनही विहीर खोदणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. त्यावर उपाय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
Brinjal Rate । वांग्याने मोडले सर्व विक्रम! जाणून घ्या दर
यावर्षी राज्यातील काही जिल्ह्यात दुष्काळाची (Drought in Maharashtra) परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी विहीर खोदण्यावर भर देऊ शकतात. अशातच आता जास्तीत जास्त विहिरींना अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या चालू २०२३-२४ वर्षाच्या वार्षिक कृती आराखड्यात विहीर खोदाईला प्राधान्य दिले आहे.
Land rule । तुम्हालाही जमीन नाही का? तर मग ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल जमीन
सरकारने दिल्या सूचना
राज्यात आता ‘प्रत्येक शेताला पाणी’ ही संकल्पना हाती घेतली आहे. यानुसार शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्यात यावे, असे धोरण सरकारने समोर ठेवले आहे. त्यामुळे आता पाच वर्षांत कमीत कमी दहा लाख शेतकऱ्यांना नवीन विहीरींना अनुदान मिळवून द्या, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
Garlic Price । आनंदाची बातमी! लसणाने गाठला उच्चांक, किलोला मिळतोय 400 रुपये दर
येथे करा अर्ज
जर तुम्हालाही आता विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीकडे संपर्क करता येतो. परंतु आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘गुगल प्ले स्टोअर’ मध्ये महा ईजीएस हार्टिकल्चर या उपयोजना (अॅप्लिकेशन) देखील उपलब्ध करून दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अगदी घरी बसून देखील ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकत? जाणून घ्या एका क्लिकवर