Spiny Gourd Farming | काळानुसार शेती व्यवसायात प्रगती होत आहे. आधीच्या काळात शेतामध्ये मुख्यतः पारंपरिक पिकांची लागवड केली जात होती. मात्र अलीकडच्या काळात शेतकरी विविध आधुनिक पिकांचे उत्पन्न घेत आहेत. यामध्ये विदेशी फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यातून शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक लाभ मिळतोय.
Havaman Andaj । मोठी बातमी! देशातील ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
सध्या तुम्ही सुद्धा कमी खर्चात जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पीक घेण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती देत आहोत. रानभाजी प्रकारातील ‘कर्टूले’ या भाजीची लागवड केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण एक किलो कर्टूले 100 ते 200 रुपये किंमतीने विकले जातात. या भाजीला बाजारात देखील चांगली मागणी आहे.
कर्टूलेची लागवड केली तर पुढील आठ ते दहा वर्षे त्यातून उत्पन्न मिळते. त्यामुळे खर्चाच्या आणि भांडवलाच्या दृष्टीकोनातून या भाजीची लागवड फायदेशीर ठरते. या भाजीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे ती महाग असते. व्यवसायिक स्तरावर कर्टूलेची लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Varities | कर्टूलेच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती
1) इंदिरा कानकोड-1
2) अंबिका-12-1
3) अंबिका-12-2
4) अंबिका-12-3
Soil | कर्टूलेची लागवड करण्यासाठी हवामान आणि माती
या भाजीच्या लागवडीसाठी ओलसर हवामान लागते. यासाठी 1500 ते 2500 मिली पाऊस आवश्यक आहे. तसेच 20 ते 25 सेंटीग्रेड कर्टूलेच्या रोपांची वाढ व्यवस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये आपण या भाजीची लागवड करू शकतो. मात्र जास्तीत जास्त सेंद्रिय घटक असणारी वालुकामय माती कर्टूलेसाठी पोषक असते.
Someshwar Factory । मोठी बातमी! बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा दसऱ्याच्या मुहूर्तावर गळीत प्रारंभ
Management | शेतीचे व्यवस्थापन कसे करावे ?
कर्टूलेची लागवड करायची असेल त्यासाठी शेताची नांगरणी करून त्यामध्ये रोपे लावण्यासाठी खड्डे तयार करून घेणे आवश्यक आहे. या खड्ड्यामध्ये बिया लावता येतात.
कर्टूलेची पेरणी करण्यापूर्वी नांगरणीच्या वेळी 200 ते 250 क्विंटल प्रती हेक्टर कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे.
तसेच 65 किलोग्रॅम युरिया, 375 एसएसपी आणि 67 किलोग्रॅम प्रती हेक्टर एमओपी द्यावे.
माशीमुळे या पिकाचे जास्त नुकसान होऊ शकते. त्यामुळे दोन ते तीन मिली इमिडाक्लोप्रीड किंवा क्विनॉलफॉस एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे.