मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकवून रहात असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामु असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते. रब्बी ज्वारीची पेरणी मोठया प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते. जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणांची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी.
पूर्व मशागत
पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळयात शेती मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ ते ६ टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडी कचरा व धसकटे वेचून शेत लाफ करावे, पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर वाफे तयार करावेत. (३.६० x ३.६० चौ.मी. आकाराचे) वाफे तयार करतांना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात. तसेच ट्रॅक्टर चलीत यंत्राने एकावेळी (६.०० x २.०० चौ.मी.) आकाराचे वाफे तयार करता येतात. सदर वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करावेत म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहे तेव्हा १५ सप्टेंबर पूर्वी ४५ दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात वाफे तयार करावे. पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवावा. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी व पून्हा सारा यंत्राच्या सहायाने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो अडवून जिरवता येईल.. या तंत्राला मुलस्थानी पाणी व्यवस्थापन असे म्हटले जाते. या तंत्रामुळे रब्बी ज्वारीचे ३०-३५ टक्के उत्पादनात वाढ होते.
सुधारित वाण
कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित / संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत.
१) हलकी जमीन (खोली ३० सें.मी. पर्यंत) फुले अनुराधा, फुले माऊली.
२) मध्यम जमीन (खोली ६० से. मी. पर्यंत) फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी- ३५-१,
३) भारी जमीन (६० से.मी. पेक्षा जास्त) सुधारित वाण फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही. २२. पी. के. व्ही. क्रांती, परभणी मोती, संकरित वाण सौ. एस. एच. १५ आणि सी. एस. एच. १९
(४) बागायतीसाठी फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्ही. १८. सी. एस. एच. १५ व सी. एस. एच. १९,
५) हुरड्यासाठी वाण: फुले उत्तरा, फुले मधुर
६) लाह्यांसाठी वाण फुले पंचमी
(७) पापडासाठी वाण: फुले रोहीणी
पेरणी
रब्बी ज्वारीपासून अधिक धान्य, कडबा आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी पेरणीपूर्वी १० ते १२ तास ज्चारी बियाणे ०.०५% पोटॅशियम नायट्रेटच्या द्रावणात (५ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट १० लिटर पाण्यात भिजवून शिफारशीत खत मात्रेसह (४०) किलो नत्र आणि २० किलो स्फुरद प्रति हेक्टर) पेरणी करावी आणि पेरणीनंतर ५५ दिवसांनी २१६ पोटेशियमची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी. ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरूरीचे आहे. त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५४१५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम अँझोटोबॅक्टर व पी. एस. बी. कल्चर चोळावे. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५४१२ सें.मी. अंतरावर करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.
आंतरमशागत
पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीन स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवणे महत्वाचे आहे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी आणि ३ वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवडयांनी फटीच्या कोळप्याने दुसरी पेरणीनंतर ५ आठवडयांनी पासेच्या कोळप्याने आणि तिसरी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळण्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल व शेतात सत्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल.
कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर
जमिनीतून ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतातून काढलेले तण,तुरकाट्या यांचा वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत टाकणे महत्त्वाचे आहे. आच्छादनामुळे उत्पादनात १४ टक्क्यापर्यंत वाढ होते असे प्रयोगाअंती आढळून आले आहे.
एकात्मिक कीड व रोग नियंत्रण
ज्वारीच्या महत्वाच्या किडी म्हणजे खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि कणसातील अळया ह्या होत. या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळी खाली ठेवण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीचा वापर करावा, यामध्ये योग्य त्या मशागती तंत्राचा वापर करून किडीचे नियंत्रण करणे महत्वाचे ठरते.
मशागत तंत्रामध्ये जमिनीतील सुप्तावस्थेत असलेल्या किडी व त्यांची अडी इत्यादीची पक्षी व इतर कीटकभक्षक प्राण्यांकडून तसेच वातावरणातील उष्णतेमुळे नाश केला जातो व कीटकांची संख्या मर्यादीत राहते. त्याकरिता उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करून २-३ कुळवाच्या पाळया देणे आवश्यक आहे. ज्वारीचा कडबा जनावरांना खाण्यास देतांना, त्याचे बारीक तुकडे (कुटी) केल्यास कोषाचा मोठया प्रमाणात नाश होतो. पुरेसा पाऊस पडल्यावर शक्य तितक्या लवकर (शिफारशीनुसार) ज्वारीची पेरणी केल्यास खोडमाशीपासून पीक वाचविता येते. पेरणी वेळेत म्हणजेच १५ सप्टेंबर ते १५ आक्टोबर या कालावधीत करावी. सुधारीत वाण फुले अनुराधा, फुले चित्रा, फुले सुचित्रा, फुले वसुधा, फुले रेवती पेरणीसाठी वापरावे. तसेच शेतकऱ्यांनी एकाच वेळी पक्व होणाऱ्या जातीची पेरणी करावी. हया व्यतिरिक्त पिकांचे फेरपालट हा सुध्दा एकात्मिक कीड नियंत्रणाचा एक महत्वाचा घटक आहे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायोमेथोक्झाम ३०% एफ एस १० मि.ली. + २० मिली पाणी प्रती १ किलो बियाणे या प्रमाणात कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी.
रब्बी ज्वारीवर साधारणपणे दिसणारे रोग म्हणजे खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि कणसातील काणी. पेरणीपूर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी म्हणजे काणी येत नाही. त्यासाठी १ किलो बियाण्यास गंधक ८० डब्ल्यु. पी. x गॅम याप्रमाणे चोळावे. खडखड्या रोगाच्या प्रादुर्भावास जमिनीतील पाण्याची कमतरता आणि जास्त उष्णतामान अनुकूल असते. त्यासाठी विशेषत: पीक फुलोऱ्यात असतांना पाण्याचा ताण असल्यास पिकांस एखादे पाणी द्यावे तसेच तुरकाटयाचे आच्छादन हेक्टरी ५ टन या प्रमाणात पेरणीनंतर चौथ्या आठवडयात केल्यास खडखड्या रोगामुळे ताटे लोळण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी होऊन धान्य उत्पादनात १४ टक्क्याने वाढ होते. अॅक्नोज या रोगाच्या नियंत्रणासाठी प्लुक्झपायरोक्ॉड ३३३ ग्रॅम प्रती लिटर एफ. एस. १ मिली प्रती किलो बियाण्यास चोळावे.
पाणी व्यवस्थापन
कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोन्यात असतांना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरतांना पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी द्यावे. भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
ज्वारीची काढणी
ज्वारीचे पीक जातीपरत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फुटतांना टच आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते, त्याप्रमाणे ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो. ही लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी. ज्वारी काढणीनंतर ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी. धान्य उफणनी करून तयार झाल्यानंतर त्याला पुन्हा साठवणुकीपूर्वी उन्हात वाळवावे. सर्वसाधारणपणे ५० किलोची पोती भरुन ठेवल्यास पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते.
उत्पादन
ज्वारीची अशा प्रकारे सुधारित तंत्राने लागवड केल्यास कोरडवाहू ज्वारीचे हेक्टरी हलक्या जमिनीवर ८-१० किंटल,
मध्यम जमिनीवर २०-२५ किंटल, भारी जमिनीवर २५-३० क्विंटल तर बागायती ज्वारीचे ३० ते ३५ क्विंटल उत्पादन मिळते..
त्याच बरोबर कोरडवाहू क्षेत्रात धान्यापेक्षा दुप्पट तर बागायतीत अडीच ते तीनपट कडब्याचे उत्पादन मिळते..