Solar system

Solar system । सोलर सिस्टम बसविण्यासाठी 40% अनुदान घेतलं तर किती खर्च येईल? अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घ्या डिटेल माहिती

शासकीय योजना

Solar system । दैनंदिन जीवनातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे वीज (Light). विजेशिवाय हल्ली अनेक कामे रखडून पडत आहेत. गावाकडे वीज जाण्याचे प्रमाण जास्त असते. अनेकदा वीज नसल्याने पिके जळून जातात. यावर उपाय म्हणून अनेकजण घरावर सोलर सिस्टम बसवतात. जर तुमच्याकडे सोलर सिस्टम बसवण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही अनुदान मिळवून सोलर सिस्टम (Solar System Subsidy) बसवू शकतात.

Poultry Farming । पोल्ट्री व्यवसायिकांनो, जास्त नफा मिळवायचाय? तर करा डॉन्ग टाओ कोंबड्याचे पालन, किंमत आहे तब्बल 1,65,000 रुपये

अनुदानासह बसवा सोलर सिस्टम

तुम्ही 2 किलोवॅटची म्हणजेच 2000 वॅटची सोलर सिस्टीम (Solar Subsidy) बसवू शकता. तुम्ही मोनोक्रिस्टलाइन सोलर पॅनल (Solar panel) किंवा पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनल (Polycrystalline solar panel) देखील इन्स्टॉल करू शकता. हे दोन्ही पॅनेल्स घरामध्ये इंस्टॉल करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. 2 किलोवॅट सोलर सिस्टीम इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला 250 वॅट्सचे 8 पॅनेल्स किंवा 335 वॅट्सचे 6 पॅनेल इंस्टॉल करू शकता.

Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?

किती मिळते अनुदान?

हे लक्षात घ्या की घराच्या क्षेत्रफळानुसार तुम्हाला पॅनेल निवडावे लागेल. 2kW सोलर सिस्टीमसाठी तुम्हाला 150Ah च्या 2 बॅटरीची गरज भासेल. नवीन बॅटरी खरेदी करतेवेळी तुम्हाला 5 वर्षांची वॉरंटी मिळेल. सोलर सिस्टिमची किंमत कंपनीनुसार ठरते. तुम्हाला 2 किलोवॅट सोलर सिस्टीममध्ये 2 हजार वॅट क्षमतेचे मोनो किंवा पॉली सोलर पॅनल्स खरेदी करावे लागतील, याची किंमत 70 हजार रुपये इतकी आहे.

Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक

तुम्हाला सोलर इन्व्हर्टर (एमपीपीटी) 25 हजार रुपयांना, सौर बॅटरी 30 हजार रुपयांना आणि स्टँड बसवण्यासाठी 15 हजार रुपये इतका खर्च येईल. ग्रिड सोलर सिस्टिममध्ये इन्व्हर्टर आणि सोलर पॅनेल वापरले जात असून यात बॅटरी वापरत नाहीत. त्यामुळे ऑफ – ग्रीड सोलर सिस्टीमपेक्षा ते थोडे स्वस्त असून यातून सरकारकडून सबसिडी देण्यात येते.

Amol Kolhe । सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरून अमोल कोल्हे संतप्त, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर केले गंभीर आरोप

दरम्यान, जे लोक त्यांच्या घरगुती वापरासाठी सौर यंत्रणा बसवतील त्यांनाच अनुदान मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. 1 ते 3 वॅटच्या सोलर सिस्टीमला केंद्र सरकारकडून 20,000 रुपये प्रति किलोवॅट जास्त अनुदान, तर 4 ते 10 किलोवॅटच्या सोलर सिस्टीमला 10,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळत आहे. ही सबसिडी 3 महिन्यांत तुमच्या खात्यात जमा होते.

Animal Husbandry Business । जनावरे माती का खातात? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपाय

असा करा अर्ज

  • सोलार पॅनल अनुदानासाठी https://solarrooftop.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याठिकाणी अप्लाय फॉर सोलार पॅनल पर्यायवर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेजवर तुमच्या सोलार पॅनल बाबत आवश्यक ती माहिती भरा.
  • अर्ज भरून दिल्यानंतर एका महिन्याच्या आत अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *