Snakes Farming । ऐकावं ते नवलच भाऊ! येथे सापाचीही करतात शेती, कसं असतं नियोजन? जाणून घ्या

पशुसंवर्धन

Snakes Farming । शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अनेकजण शेतीसोबत मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात.

तुम्ही कधी सापाची शेती केल्याचे ऐकले आहे का? किंवा तुम्हाला सापाची शेती (Snake farming information) करायला लावली तर कराल का? अनेकांना साप दिसला तरी घाम फुटतो. जगात अनेक विषारी सापांच्या जाती आहेत. अनेकांना साप चावल्याने जीव गमवावा लागतो. पण जगात असा एक देश आहे, येथील लोक सापाची शेती करतात. हे ऐकून तुम्हालाही थोडेसे नवल वाटले असेल. चीन या देशात सापाची शेती करतात.

सापांची शेती हा चीनमधील जिसिकियाओ गावातील लोकांचा मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. या गावाला स्नॅक व्हिलेज असे म्हटले जाते. सापांची शेती करून येथील लोकांनी बक्कळ पैसा कमावला आहे. या गावाची लोकसंख्या एक हजार आहे. या गावातील प्रत्येक व्यक्ती 30 हजार साप पाळून प्रत्येक वर्षी करोडो सापांची पैदास करतात. यात सापांच्या कोब्रा, अजगर यांसह अनेक धोकादायक सापांच्या जातींचा समावेश आहे.

कमाई

सापाचे मांस, त्याच्या शरीराचे इतर अवयव आणि सापाचे विष बाजारात विक्री करून चांगली कमाई करतात. महत्त्वाचे म्हणजे कमाईचा विचार केला तर या सापाच्या विषाची किंमत सोन्यापेक्षा देखील खूप जास्त आहे. सर्वात धोकादायक सापाच्या एका लिटर विषाची किंमत 3.5 कोटी रुपये इतकी आहे. स्नेक करी आणि सूप येथे लोकप्रिय आहे.

विविध औषधांची निर्मिती

सापाचे अवयव औषध बनवण्यासाठी खूप उपयुक्त असून त्यापासून पुरूषशक्ती आणि कर्करोगावरील औषधे तयार केली जातात. सापांची त्वचा काढून उन्हात वाळवून सापाच्या मांसाचा वापर अन्न आणि औषधासाठी करतात. त्वचेचा वापर महागडे बेल्ट आणि इतर वस्तू बनवण्यासाठी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *