Smuggling of onion

Smuggling of onion । धक्कादायक! टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची तस्करी, कंटेनरमध्ये लपवला 82.93 मेट्रिक टन कांदा

बातम्या

Smuggling of onion । यंदा कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीला कांद्याचे दर कोसळले त्यानंतर सरकारने कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) केली. सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याचे आणखी दर कोसळले (Onion price) आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. निर्णय मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस

टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची तस्करी

टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी (Onion smuggling) होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा (Onion) लपवून यूएईला पाठवला जात आहे, अशी गोपनीय माहिती सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे

Diseases Of Chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा पॅक करुन UAE ला पाठवण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी सीमा शुल्क विभागाच्या (Customs Department) नागपूरच्या टीमकडून मुंबईला जाऊन कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्स होते, तर त्यामागे कांद्याची पोती लपवून तो UAE ला पाठवले जात असल्याचे समोर आले आहे.

PM Kisan Mandhan Yojana । शेतकऱ्यांसाठी शानदार योजना! 55 रुपये भरून महिन्याला मिळवा 3000 रुपये, जाणून घ्या योजना

दरम्यान, भारतीय कांदा हा विविध देशांमध्य निर्यात करण्यात येतो, भारतीय कांद्याला परदेशात खूप मागणी आहे. मलेशिया, बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. पण अचानक सरकारनं निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Apple Cost In America । अमेरिकेत एक किलो सफरचंदासाठी किती मोजावे लागतात पैसे? जाणून व्हाल हैराण

शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली असून कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या निर्णयानंतर अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवले होते.

Bamboo Farming । बांबू लागवडी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *