Sitafal rate

Sitafal Rate । सीताफळाचे दर तेजीत; मिळतोय ९ हजार रुपये पर्यंत दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

बाजारभाव

Sitafal Rate । मागच्या काही दिवसांपूर्वी सीताफळाचे दर हे कमी होते. त्यामुळे सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता सध्या सिताफळाला चांगला दर मिळत असल्याने सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजाच्या अनेक भागात एप्रिल मे महिन्यात झालेल्या पावसामुळे फुलधारणा सेटिंग आणि फळधारणा होत सीताफळे चांगली परिपक्व झाली. अशी फळे बाजारात काही प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत व्यापारी देखील याची खरेदी करत आहेत. (Sitafal Rate)

Havaman Andaj । आज सुट्टी दिवशी घराबाहेर पडत असाल तर सावधान! हवामान विभागाने पावसाबद्दल दिली मोठी अपडेट

पूर्व हंगामी असलेल्या या सीताफळांना सुरुवातीला ५००० ते ७००० रुपयांचा दर मिळत होता. मात्र अचानक सीताफळाची आवक कमी झाली आणि त्यामुळे सीताफळाचे दर वाढू लागले सध्या सीताफळाला ६००० ते ९००० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Soybean Rate । आज सोयाबीनची बाजारातील परिस्थिती कशी? जाणून घ्या एका क्लिकवर

हंगामाच्या शेवटी दर घसरण्याची शक्यता

सध्या सीताफळाची बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे सिताफळाला चांगला दर मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सीताफळाला 7000 रुपये ते 9000 रुपये क्विंटल सध्या बाजारात मिळत आहे. हंगामी फळे बाजारात आल्यानंतर देखील सिताफळाला असा दर मिळेल असे तज्ञांनी सांगितले आहे. मात्र हंगामाच्या शेवटी सिताफळाचे दर कमी होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत सिताफळाला दर मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Havaman Andaj । सावधान! काळे कुट्ट आभाळ अन् येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या सीताफळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या सीताफळाचे पावसामुळे तर काही शेतकऱ्यांच्या सीताफळाचे काळे डाग पडून रोगराईने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात सीताफळ कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे सिताफळाला चांगला दर मिळत आहे.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला मिळाला आज सर्वाधिक ‘इतका’ दर; जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *