शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यामध्ये महापूर, दुष्काळ या सर्व नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जंगली प्राण्यांचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी अनोखी शक्कल लढवत कायम जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करत असतात. जंगली प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक शेतकरी शेतातील तारांच्या कुंपणांमध्ये जिवंत विद्युत वायू प्रवाहित करतात. मात्र यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना देखील जीव गमावा लागतो.
Maharstra Rain । मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मोठं मोठी झाडे कोसळली
सध्या देखील एक अशीच धकादायक घटना समोर आली आहे, अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोरा काकडे शेत शिवारात घटना घडली आहे, या ठिकाणी एका शेतकऱ्याला शेतातील तारांच्या कुंपणांमध्ये जिवंत विद्युत प्रवाहित केल्यामुळे जीव गमवावा लागला आहे.
गोपाल मधुकर राऊत असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, या शिवारातील शेतकरी अनुप देवदास मानकर यांनी आपल्या शेतात तारेच्या कुंपणात जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. यानंतर गोपाल राऊत हे त्यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांचा संपर्क कुंपणाशी झाला आणि विजेचा धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आता आरोपी अनुप मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कुंपणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाहित केल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येतात. यामध्ये शेतकरी असेल, गुराखी असेल, त्याचबरोबर शेतमालकांचे देखील जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे कोणीही कुंपणाला विद्युत तारा जोडू नये असे आव्हान देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.
Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे