Sheep Farming

Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन

पशुसंवर्धन

Sheep Farming । भारतात अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. यातून चांगला नफा मिळवता येतो. शिवाय तुम्ही कमी खर्चात व्यवसाय सुरु करू शकता. अनेकांचे केवळ शेतीवरच पोट भरत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत जोडव्यवसाय सुरू करतात. अनेकजण मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. विशेष म्हणजे कमी जागेतही तुम्हाला हा शानदार व्यवसाय सुरू करता येतो.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

विशेष म्हणजे लाखो रुपयांची नोकरी सोडून तरुणवर्ग या व्यवसायाकडे वळत आहे. जर तुम्हीही आता हा व्यवसाय केला तर तुम्हाला यातून दुप्पट नफा मिळेल. मेंढीचा वापर केवळ दुधासाठी नाही तर लोकर आणि मांसासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे बारा महिने या व्यवसायाला चांगली मागणी असते. तसेहच तुम्ही जास्त नफा मिळवून देणाऱ्या मेंढीच्या जातीचे संगोपन केले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.

Onion Rate । कांद्याचे दर वाढले? जाणून घ्या बाजारातील परिस्थिती

करा या प्रजातीचे संगोपन

तुम्ही मंडिया, मारवाडी, मालपुरा, जैसलमेरी, बिकानेरी, मारिनो, कॉर्डिलेरा माबुटू, शहाबाद आणि छोटा नागपुरी या प्रजातींचे पालन करू शकता. या मेंढ्यांमधून तुम्ही जास्तीत जास्त दूध आणि लोकर मिळवू शकता.

किती येईल खर्च?

खर्चाचा विचार केला तर एका मेंढीची किंमत तीन हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत अशी जातींनुसार मेंढीची किंमत असेल. मेंढ्यांना जास्त खर्चिक गोठ्याची गरज नसते. गोठ्यांमध्ये हवा खेळती असावी. हिवाळ्याच्या दिवसात आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे गोठ्यात ओलावा टिकून राहतो त्यामुळे गोठ्यात सूर्यकिरणे पडुन गोठ्यातील ओलसरपणा कमी होईल अशापद्धतीने बांधकाम करणे गरजेचे आहे.

Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या

अशी घ्या काळजी

मेंढ्यांच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कळपातील मेंढ्यांना चरायला बाहेर न्यावे. मेंढ्यांचे आयुष्य साधारणतः 7 ते 8 वर्षे असते. थंडीच्या दिवसात आजार लवकर पसरत असल्याने जंतुनाशकाने आठवड्यातून एकदा गोठा चांगला धुवावा. मेंढ्यांच्या लहान पिलांना वेळोवेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावी.

Ujani Dam Water Level । आनंदाची बातमी! उजनी धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; धरणाने ओलांडला ३१ टक्क्यांचा टप्पा

जाणून घ्या फायदे

खरंतर ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून मेंढीपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. मेंढ्यांपासून लोकर, मांस आणि दूध, शेण मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच मेंढ्यांच्या लोकरीपासून अनेक प्रकारचे कपडे तयार केले जातात. त्यामुळे आजच हा फायदेशीर व्यवसाय सुरु करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *