Sericulture Farming

Sericulture Farming । तुम्हालाही मिळेल रेशीम शेतीसाठी 3 लाखांचे अनुदान! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

शासकीय योजना

Sericulture Farming। मागील काही वर्षामध्ये शेतकर्‍यांकडून विविध नाविण्यपूर्ण पीक लागवडीचे प्रयोग केले जात आहेत. विशेष म्हणजे याचा त्यांना मोठा फायदाही होत आहे. इतर पिकांपेक्षा या पिकांना जास्त महत्त्व आले आहे. परंतु त्यासाठी नियोजन खूप गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केले तर तुम्हाला प्रत्येक वर्षी लाखो रुपयांची कमाई सहज करता येईल. (Sericulture Farming)

विशेष म्हणजे सरकार कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत. ज्याचा लाभ तुम्हीदेखील सहज घेऊ शकता. राज्यात मोठ्या प्रमाणावर तुतीची लागवड केली जात आहे. सरकार तुतीची लागवडीसाठी अनुदान देत आहे. फक्त रेशीम उत्पादनासाठी नाही तर शेळ्या, गाई किंवा म्हशी असतील तर त्यांना तुतीचा पाला खायला देतात. ज्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होते.

निकष

या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असणे गरजेचे आहे. लागवड करण्यात आलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय देखील उपलब्ध असावी.

कोणाला घेता येतो लाभ?

या अनुदानाचा लाभ दारीद्रय रेषेखालील कुटुंब,अनुसुचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, शारिरीक अपंगत्व प्रधान कुटूंब, भुसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, महिला प्रधान कुटूंब, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी कृषी माफी योजना सन २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकऱ्यांना घेता येतो.

अशी होईल लाभार्थ्यांची निवड

  • ग्राम पंचायतीच्या प्रत्येक महसुली गावामध्ये तुम्हाला अर्ज करता येईल.
  • कोणाला किती लाभ घेता येईल याबाबतचा निर्णय ग्रामसभेत घेतला जाईल आणि त्यानुसार लाभार्थ्यांची निवड होईल.
  • जे या योजनेसाठी इच्छुक आहेत त्यांनी पूरक लेबर बजेट तयार करून एक डिसेंबर ते पुढील वर्षाचे 14 जुलै पर्यंत अर्ज पेटीत किंवा ऑनलाईन प्राप्त अर्जांना त्याच्या महिन्याच्या पंचायत सभेत मान्यता देऊन पंचायत समितीत मान्यतेसाठी पाठवणे खूप गरजेचे आहे.
  • कृषी विभाग तसेच पंचायत समिती विभाग व रेशीम संचालनालय यांच्या समन्वयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुतीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अंडपुंज पुरवठा करेल.

कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे जमिनीचा सातबारा तसेच आठ अ चा उतारा, आधार कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड तसेच राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो आणि जात वर्गवारी इत्यादी कागदपत्र असावी.

अनुदानाचे स्वरूप

शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवडीकरिता 2.24 लाख अनुदान तीन वर्षात विभागून दिले जाणार आहे. 1000 चौरस फूट बांधकामाकरिता 99 हजार रुपये म्हणजेच एकूण तीन लाख 23 हजार एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *