Seed Subsidy

Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता उन्हाळी हंगामात अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे

शासकीय योजना

Seed Subsidy । भुईमूग (Groundnut) हे असे पीक आहे जे शेतकऱ्यांना हमखास जास्त उत्पन्न मिळवून देते. कोणत्याही हंगामात भुईमूगाची लागवड (Groundnut cultivation) करण्यात येते. भुईमुगाचे बियाणे सर्वात जास्त महाग आहे आणि याच कारणामुळे भुईमूग पेरणीचे क्षेत्र घटले आहे. येत्या काही दिवसातच भुईमुगाची पेरणी सुरु होईल. जर तुम्हीही भुईमूग पेरणी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Cultivation of Groundnut)

Success Story । कांद्याच्या पट्ट्यात फुलवली केळीची बाग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पादन; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे

यावर्षी उन्हाळी हंगामासाठी जिल्ह्यात तब्बल १४०० क्विंटल भुईमूग बियाणे ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानावर उपलब्ध (Groundnut seeds) करून देण्यात येणार आहे. उन्हाळी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानामध्ये भुईमूग बियाण्यासाठी ग्राम बीजोत्पादनातंर्गत अनुदानावर बियाणे विक्री महाबीजमार्फत बुलडाणा जिल्ह्यासाठी विक्रेते आणि उपविक्रेत्यांद्वारे सुरू झालेली आहे. (Groundnut seeds subsidy)

Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण

या सरकारी योजनेमध्ये भुईमूग TAG-24 प्रमाणित वाणाचे बियाणे उपलब्ध असून किमतीचा विचार केला तर या बियाण्याची २० किलो वजनाच्या बॅगेची मूळ किंमत ३१४० रुपये आहे. सरकार यासाठी एक हजार रुपये अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना हे बियाणे अनुदानित २१४० रुपये प्रति बॅग या अनुदानित दराने मिळणार आहे.

Government Schemes । क्या बात है! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 37500 रुपये, कसं ते जाणून घ्या

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासाठी १४०० क्विंटल बियाण्याचा लक्ष्यांक कृषी विभागाकडून दिला आहे. सर्वात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे उपलब्ध असणाऱ्या लक्ष्यांकाच्या मात्रेनुसार योजनेतील समाविष्ट वाणाचे बियाणे निर्धारित प्रवर्गनिहाय शेतकऱ्यांना अनुदानावर खरेदी करता येणार आहे, असेही प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

Blue Fin Tuna Fish । ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा मासा…कोटींच्या घरात किंमत; माहिती वाचून व्हाल थक्क

आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांना त्यासाठी सातबारा, आठ-अ आणि आधार कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Kisan Credit Card । सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरात लाखो रुपयांचं कर्ज, जाणून घ्या योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *