SCSS

SCSS । दरमहा 20,500 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! शेतकऱ्यांनो त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक

शासकीय योजना

SCSS । प्रत्येक व्यक्तीला आपल्या वृद्धापकाळाची खूप चिंता सतावत असते. जर तुम्हालाही ही चिंता सतावत असेल आतापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करा. अनेकजण जास्त व्याज आणि कोणतीही जोखीम नसलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तुम्हाला देखील जास्त कमाई करायची असेल तर तुम्ही देखील या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. सरकारची अशीच एक योजना आहे.

Fruit processing industry । लगेचच सुरु करा फळप्रक्रिया उद्योग, सरकार देतंय १० लाखांपर्यंत अनुदान

या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला 20,500 रुपये मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्या की, ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला या योजनेचे नियम आणि अटी माहिती असावेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) असे या योजनेचे नाव आहे. 30 लाख रुपयांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता.

Cotton prices । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार दर

असे मिळतील दरमहा 20,500 रुपये

5 वर्षांच्या कालावधीसाठी, व्याजदरानुसार त्रैमासिक आधारावर जमा करण्यात आलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम मिळते. समजा प्रत्येक तिमाहीत गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होणारी व्याजाची रक्कम 61,500 रुपये इतकी आहे. मासिक आधारावर पाहिल्यास योजनेच्या गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला 20,500 रुपये मिळतात.

Cow Poisoning । धक्कादायक! विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

अशी करा गुंतवणुकीस सुरुवात

सरकारची ही वृद्धांसाठी बचत योजना आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) खाते चालू करून 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. किमान गुंतवणूक रक्कम 1,000 रुपये असून योजनेसाठी गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. जरी कालावधी 5 वर्षांचा असला तरी तुम्ही तो वाढवू शकता. डिसेंबर तिमाहीसाठी गुंतवणुकीच्या रकमेवर 8.02 टक्के दराने व्याज मिळेल.

Satbara Utara । सातबारा देखील असतो बोगस! ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि ओळखा बनावट सातबारा

जाणून घ्या पात्रता

  • 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
  • निवृत्त संरक्षण कर्मचारी, ज्यांचे वय कमीत कमी 60 वर्षे असावे.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

खातेदाराचा मृत्यू झाल्यास..

समजा खाते परिपक्व होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला तर खातेदाराचे खाते बंद केले जाते. सर्व रक्कम त्याचा कायदेशीर वारस किंवा नाॅमिनीकडे हस्तांतरित केली जाते. परंतु दाव्यासाठी नाॅमिनी किंवा कायदेशीर वारसांनी मृत्यू प्रमाणपत्रासह विहित नमुन्यात लेखी अर्ज देणे गरजेचे असते.

Nashik News । कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! तब्बल 12 दिवस राहणार बंद लासलगाव बाजार समिती, नेमकं कारण काय?

मिळेल कर लाभ

महत्त्वाची बाब म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करून 1.5 लाख रुपयांची कर लाभ मिळतो.

Havaman Andaj । राज्यात अवकाळी पावसाचे थैमान! येत्या २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *