Satbara Utara

Satbara Utara । सोप्या पद्धतीने मोबाईलवरून काढा 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे, कसे ते जाणून घ्या

शेती कायदे

Satbara Utara । सतत जमिनीशी निगडित वाद (Disputes related to land) होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम (Land rule) आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावेत. वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीच नाव सातबारा उताऱ्यावर लागले आहे, यांसारख्या तक्रारी अनेक जण करतात.

Sarkari Yojna । मुलीच्या लग्नाची कटकट संपली! सरकारची ‘ही’ योजना देईल ६४ लाख रुपये

तुम्ही आता शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र भूमि अभिलेख सातबारा आणि 8 अ अभिलेख ऑनलाईन (Satbara Utara Online) करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे आता भूलेख महाभूमी वेब पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या 1980 पासूनचे जुने फेरफार आणि सातबारा उतारे तुम्हाला डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढता येईल.

Urea Price । ४५ किलो नाही तर आता मिळणार ४० किलोची युरियाची बॅग, दरात देखील होणार २४ टक्क्यांची वाढ

अशाप्रकारे पहा उतारे

  1. तुम्हाला गुगल किंवा इतर कुठल्याही वेब ब्राउझरमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले अभिलेख असे टाईप करून सर्च करावे लागेल,यानंतर हे पोर्टल ओपन होते.
  2. या पोर्टलवर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घराचा पत्ता आणि लॉगिनची माहिती देऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते.
  3. तुम्हाला रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यावे लागते.
  4. यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडून तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडा. त्यानंतर तुम्हाला कोणता उतारा हवा आहे त्याची निवड करावी.
  5. तुम्हाला सातबारा हवा असल्यास सातबारा, आठ अ चा उतारा हवा असेल तर 8अ असे पर्याय त्या ठिकाणी असतात व त्यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. यात जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार असतात.
  6. पुढे गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  7. त्यानंतर सर्च रिझल्ट या पेजवर टाकलेल्या गट क्रमांकशी निगडित फेरफाराची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
  8. आता तुम्हाला फेरफारच वर्ष आणि क्रमांक दिसेल, तुम्हाला ज्या वर्षाचा सातबारा किंवा इतर कागदपत्र हवे आहे त्या वर्षावर क्लिक करून तुम्ही संबंधित वर्षाचा फेरफार पाहता येईल.
  9. आता सर्च या बटणावर क्लिक करून डाऊनलोड अवेलेबल फाईल या बटनावर क्लिक करा.
  10. जी माहिती भरली आहे त्यानुसार तुमच्या स्क्रीनवर काही सर्च रिझल्ट येतात. यामध्ये तुम्हाला जुने सातबारा उतारे आणि फेरफार नंबर वर्षानुसार दिसतात.

Wild animal attacks । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार २० लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *