Sarkari Yojna

Sarkari Yojna । सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार रासायनिक खते

शासकीय योजना

Sarkari Yojna । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ “जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. राज्यामध्ये ८० % अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याकारणाने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत होते. या पार्श्वभूमीवर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकन्यांसाठी राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास दि. ०६.०७.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. (Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme)

Soybean Rate । सोयाबीनचे भाव वाढले का? पाहा बाजारातील स्थिती

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पिक या योजनेतून अदा करण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनामधुन ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबी ऐवजी खते देणे ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्यात आली आहे. याबाबत आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सन २०२३-२४ पासून खालीलप्रमाणे बदल करण्यास सरकारने मान्यता दिली

१) सन २०२३ २४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी रासायनिक व सेंद्रीय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२) तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबीच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात येत आहे. (परिशिष्ट-अ)

३) यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये (परिशिष्ट-अ) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

४) उपरोक्त प्रमाणे योजनेंतर्गत केलेले बदल व सुधारित मापंदड सन २०२३-२४ पासून लागू राहतील. त्याप्रमाणे आयुक्त (कृषि) यांनी क्षेत्रीय यंत्रणेस योजनेच्या अंमलबजावणीकरिता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.

Onion Rate । सोलापूर बाजारसमिती कांद्याला आज मिळाला सर्वाधीक ‘इतका’ दर; वाचा एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *