Sandalwood Plantation

Sandalwood Plantation । करोडोंची कमाई करायची असेल तर आजच करा चंदन लागवड, अशी करा सुरुवात

कृषी सल्ला

Sandalwood Plantation । सध्या राज्यावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिके जळू लागली आहेत. परंतु आता तुम्ही कमी पाण्यावर शेती करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला या शेतीतून करोडो रुपयांची कमाई करता येईल. कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत तुम्ही ही शेती करू शकता. केंद्र सरकार देखील या शेतीला प्रोत्साहन देत आहे.

तुम्ही आता कमी पाण्यावर चंदनाची लागवड करू शकता. चंदनाला फक्त भारतीय बाजारपेठेत नाही तर जगभरात खूप मागणी आहे. याचा वापर सौंदर्य वाढवण्यासोबतच आयुर्वेदिक औषधात करण्यात येतो. तुम्ही सेंद्रिय पद्धत आणि पारंपारिक पद्धतीने चंदनाची लागवड करू शकता. लागवड करताना हे लक्षात ठेवा की चंदनाचे 2 ते 2.5 वर्षे जुने रोप लावावे.

लागवड

एक रोप 100-150 रुपयांना मिळते. चंदनाच्या रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करा. चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असते. त्यामुळे दोन चंदनाच्या झाडामध्ये एक वृक्ष प्रजाती जरूर लावा. यात तुम्ही जांभूळ, करवंद, डाळिंब, पेरू, नीम, मेलिया डुबिया यांची निवड लागवड करू शकता. सुरवातीला या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावा. त्यांची सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्या. चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली की तूर काढून टाका.

कमाई

कमाईचा विचार केला तर सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या चंदन 10-15 वर्ष तर पारंपारिक पद्धतीने लागवड केलेल्या चंदनातुन 20-25 वर्षांनी नफा मिळतो. एका चंदनाच्या झाडापासून 15-20 किलो लाकूड मिळते. एका किलोला 3 ते 7 हजार रुपये दर तर मागणी जास्त असेल तर 10 हजार रुपये किलो दर मिळतो.

लक्षात ठेवा हे

चंदनाची लागवड करण्यासाठी सरकारची परवानगी लागते.
चंदन एक संरक्षित वन प्रजाती असल्याने तोडणीस आणि विक्रीस वनरक्ष कायदा १९५६ अंतर्गत पुरवठा परवानगी घ्यावी लागते.
लागवडीनंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्या.
शिवाय संबंधित वन अधिकाऱ्याचा आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्राप्त करून घ्या.

चंदनाचे महत्त्व

सौंदर्यप्रसाधने, मेणबत्त्या, साबण, परफ्यूम, धूप आणि आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी चंदन लाकडाची पावडर करून वाफेने ते तेलात डिस्टिल्ड केले जाते. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सौंदर्य उत्पादनांत चंदनाचे तेल वापरतात. त्यामुळे आजच बहुगुणी आणि बक्कळ कमाई करून देणाऱ्या चंदनाची लागवड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *