Sandalwood Farming

Sandalwood Farming । शेतकऱ्यांनो करा ‘हे’ काम, तुम्हालाही चंदन लागवडीतून करता येईल करोडोंची कमाई

शेतीपूरक व्यवसाय

Sandalwood Farming । चंदनाची फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात खूप मागणी आहे. चंदन ही सर्वात जास्त महाग वनस्पती आहे. ज्याचा वापर विवीध कामात केला जातो. जर तुम्ही चंदनाची लागवड केली तर तुम्हीदेखील करोडो रुपयांची कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. सरकार देखील लागवडीसाठी (Sandalwood Cultivation) प्रोत्साहन देत आहे.

Krushi Yojna । मागेल त्याला योजनेत लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? फक्त एकाच क्लिकवर तपासा

वेद आणि पुराणात चंदनाचे फायदे सांगितले आहेत. चंदनाचा सौंदर्य वाढवण्यासोबतच आयुर्वेदिक औषधात वापर करतात. चंदनाची लागवड फक्त दक्षिणेकडील भागात नाहीतर आज बर्फाळ प्रदेश वगळता भारतातील जवळपास सर्व राज्यांत केली जाते. जाणून घेऊयात याची लागवड कशी करतात? (Sandalwood Cultivation Information)

Agriculture News । ऐकावं ते नवलंच! केवळ ४ तासात शेतकरी बनला कोट्याधीश, कसं ते जाणून घ्या

अशी केली जाते चंदनाची लागवड

देशात चंदनाची लागवड दोन प्रकारे करतात. ज्यात सेंद्रिय पद्धत आणि पारंपारिक पद्धतीचा समावेश आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आलेले चंदन 10-15 वर्षात लाकडात बदलते. चंदनाची पारंपरिक पद्धतीने लागवड केली तर तुम्हाला 20-25 वर्षांनी नफा मिळतो. एका चंदनाच्या झाडापासून 15-20 किलो लाकूड मिळत असून बाजारात त्याची किंमत 2 लाख रुपयांपर्यंत आहे. चंदन 3 ते 7 हजार रुपये किलो दराने विकले जात असून मागणी वाढली तर ते 10 हजार रुपयांपर्यंत विकण्यात येते.

Success Story । आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज ‘ही’ महिला शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल; संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

उत्पन्न

रोपवाटिका उभारण्याबद्दल सांगायचे झाले तर एक रोप 100-150 रुपये किमतीला मिळते. जर इच्छा असेल तर ते एक हेक्टर जमिनीवर 600 रोपे लावता येतात. हीच रोपे झाडे बनतात आणि पुढील 12 वर्षांत 30 कोटी रुपयांपर्यंत नफा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे एकट्या चंदनाच्या झाडातून ६ लाख रुपयांची कमाई केली जाते.

Milk Rate | दूध उत्पादकांना मोठा झटका! गायीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांनी झाली घसरण, जाणून घ्या नवे दर

मिळेल सरकारी मदत

काही वर्षांपूर्वी चंदनाच्या लागवडीवर बंदी घातली होती, शेतकरी सरकारची परवानगी घेऊनच चंदनाची लागवड करतात. आता सरकार 28-30 हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. फक्त सरकारच शेतकऱ्यांकडून चंदन खरेदी करू शकते.

Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी

लक्षात ठेवा या गोष्टी

  • चंदनाचे एकटे झाड कधीही लावू नका, कारण ही एक परजीवी प्रजाती असून जी इतर झाडांपासून पोषण मिळवते.
  • तसेच चंदनाचे झाड दमट भागात लावू नये, कारण त्याला जास्त पाण्याची गरज नसते.
  • चंदन ही झपाट्याने वाढणारी वनस्पती असल्याने इतर प्रकारची झाडे 4-5 फूट अंतरावर लावा.
  • चंदनाच्या झाडाला जास्त पाणी दिले तर ते कुजते, त्यामुळे जास्त पाणी देणे टाळावे.
  • लागवडीसाठी, किमान 2 ते 2.5 वर्षे जुन्या रोपाची लागवड करा.
  • चंदनाच्या झाडांची प्रदूषणामुळे वाढ थांबते.

Government Schemes । शेतकरी बांधवांनो, होईल फायदाच फायदा! त्वरित करा हरितगृह, ट्रॅक्टर आणि कांदाचाळीसाठी अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *