Saffron farming

Saffron farming । केशरची शेती करून तुम्ही कमावू शकताय करोडो रुपये; जाणून घ्या कशी करावी लागवड?

कृषी सल्ला

Saffron farming । काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर केशरची शेती करतात. फक्त तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने या पिकाला जगभरात चांगली मागणी आहे. केशरची विक्री तोळ्यावर केली जाते. भारतात मागणीच्या फक्त 3 ते 4 टक्केच उत्पादन घेतले जाते. परंतु आता तुम्हीही केशरची शेती करू शकता. याच्या लागवडीतून तुम्हाला करोडो रुपयांची कमाई करता येईल.

Havaman Andaj । राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

केशर हे नाव जरी आपण कुठे ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर लगेचच काश्मीर उभा राहतो. आता केशर शेतीतील वाढता नफा पाहता सुशिक्षित तरुणांचा देखील कल याच्या शेतीकडे वाढत आहे. केशरला लाल सोने म्हणून ओळखले जाते. याची कमाई मागणीवर अवलंबून असते. दरम्यान, केशर हे जगातील सर्वात महाग मसाल्यापैकी एक आहे.

लागवडीचा कालावधी

केशरची लागवड समुद्रसपाटीपासून 3,000 मीटर उंचीवर करा. ज्या ठिकाणी उष्ण हवामान आहे, त्या ठिकाणी केशराची लागवड करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केशर लागवडीसाठी थंडी आणि पावसाळा ठीक नाही. केशराच्या लागवडीसाठी वालुकामय, चिकणमाती असणारी जमीन खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे केशरचे चांगले उत्पादन होते. यासाठी 10 व्हॉल्व्ह बिया वापरतात, त्याची किंमत 550 रुपये आहे.

Maharastra Rain । धक्कादायक बातमी! पाऊस नसल्याने करमाळ्यातील शेतकऱ्याने पेटवली दोन एकर लिंबाची बाग

केशरच्या लागवडीसाठी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने सर्वात उत्तम मानले जातात. या झाडांना ऑक्टोबर महिन्यामध्ये फुले येतात. उंच डोंगराळ भागामध्ये केशर लावण्यासाठी जुलै-ऑगस्ट हा उत्तम काळ आहे आणि मैदानी भागामध्ये केशराची लागवड फेब्रुवारी-मार्च दरम्यान करतात.

केशरची सुरुवातीपासूनच खूप काळजी घ्यावी लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे या पिकाचे बियाणे 15 वर्षांतून एकदाच पेरतात. प्रत्येक वर्षी त्यात फुले येतात. या फुलांमधून केशर काढतत्. केशरला एक फूल लागते आणि एका फुलाच्या आत, पानांच्या मध्यभागी 6 पाने निघतात, यात केशराची दोन-तीन पाने असून त्याचा रंग लाल असतो. शिवाय यात तीन पाने पिवळ्या रंगाची असतात, परंतु त्यांचा काही उपयोग नसतो.

Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ

विक्री

विक्रीचा विचार केला तर तुम्ही तर ऑनलाइन विकू शकता. केशरची विक्री तोळ्यावर केली जाते. त्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही प्रत्येक महिन्याला 2 किलो केशरची विक्री केली तर तुम्हाला 6 लाख रुपये कमवता येतील. या शेतीमध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *