Red Chilli । मिरची ही जेवणाची चव वाढवणारा एकमेव पदार्थ आहे. बाजारात फक्त हिरवी मिरची (Green Chilli) नाही तर सुकलेल्या मिरचीलाही खूप मागणी आहे. मागणी जास्त असल्याने मिरचीची (Green Chilli Price) मोठ्या प्रमाणावर लागवड (Chilli Cultivation) केली जाते. काही वेळेस मिरचीचे दर पडतात तर काहीवेळा मिरची उच्चांक गाठते. नंदुरबार जिल्हा मिरचीचे आगार म्हणून ओळख आहे. दरम्यान, बाजारात मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
Government Subsidy । सोडू नका अशी संधी! कृषी यंत्रांवर मिळत आहे 50 टक्के अनुदान, आजच करा अर्ज
देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव डोळ्यासमोर येते. या बाजार समितीमध्ये दररोज तब्बल 300 ते 400 वाहनातून तीन ते चार हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होते. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी मिरचीची आवक जास्त असूनही मिरचीचे दर जैसे थे आहेत. दर वाढल्याने (Chilli price hike) शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याची कमाल! पपईतून घेतले विक्रमी उत्पादन
दरम्यान, आतापर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी 90 हजार क्विंटल मिरचीची खरेदी केली आहे. हा हंगाम आणखी पाच महिने सुरू राहील. साहजिकच या बाजार समितीत मिरची खरेदी विक्रीची विक्रमी उलाढाल होईल. 25 ते 26 व्यापाऱ्यांकडून या मिरचीची खरेदी (Chilli price) होत आहे. मिरचीला चांगला दर मिळत आहे. यावर्षी मिरचीला पोषक वातावरणाचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.
Wheat Farming । शेतकऱ्यांनो, गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी द्यावे? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ
वास्तविक आंध्र प्रदेशातील गुंटूरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची उत्पादन घेण्यात येते. परंतु अजूनही या ठिकाणी राज्य सरकारकडून मिरची प्रक्रिया उद्योग आणि मिरची संशोधन केंद्र चालू केले नाही. त्यामुळं मिरची उत्पादकांना अनेक अडचणी येतात. लवकरात लवकर शेतकऱ्यांची ही समस्या सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
दुपटीने वाढले दर
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मिरचीचे भाव मागील वर्षापेक्षा यावर्षी भाव दुपटीने वाढले आहेत. याचा फायदा जरी शेतकऱ्यांना होत असला तरी सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. जास्त पैसे देऊन त्यांना मिरची खरेदी करावी लागत आहे. मागील वर्षी मिरचीला 2500 रुपये क्विंटल दर मिळाला. परंतु यावर्षी मिरचीचे भाव वाढल्याने मिरचीला सरासरी तीन ते साडेतीन हजारापर्यंत दर मिळाला आहे. चटणीचे दर देखील दुप्पट झाले आहे.