Real Estate

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

शेती कायदे

Real Estate । समजा शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असल्यास किंवा जमिनीची हद्द जाणून घ्यायची असल्यास तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असावा लागतो. सरकारने आता सातबारा (Saatbara) आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही तो घरी बसून सहज पाहू शकता. तुम्हाला कोठेही जाण्याची गरज भासणार नाही.

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

सर्व व्यवहारांमध्ये रेडीरेकनर दर खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय अनेकांना आपल्या जमिनीचा झोन म्हणजेच ग्रीन झोनमध्ये जमीन आहे की इतर कुठल्या झोन मध्ये आहे? हे माहिती नसते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. अशातच आता राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

तुम्ही खरेदी करत असणारी एखादी जमीन किंवा फ्लॅटचे जे काही सरकारी बाजार मूल्य म्हणजेच रेडी रेकनरचे दर असतात. ते तुम्हाला आता त्या जमीन किंवा फ्लॅटचा प्रत्यक्ष नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह आता पाहायला मिळणार आहे. या नकाशांचा वापर आता व्यवहारांमध्ये केला जाईल. त्याला रेडिरेकनरचे दर (Recalculator rates) आणि सातबारा उतारा जोडला जाईल.

Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत

आता जानेवारी 2024 मध्ये रेडीरेकनरचे दर जाहीर केले जाणार आहेत. यामुळे तुम्ही खरेदी करत असलेली जमीन किंवा शहरी भागातील इमारतीमधील फ्लॅट तुम्हाला आता दृश्यमान पद्धतीने दिसतील. नवीन सुविधेमुळे तुम्हाला संबंधित जमीन किंवा फ्लॅट ग्रीन झोनमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करता येईल. दरम्यान, विदर्भामधील गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये काम सुरू केले आहे.

Havaman Andaj । पुढील 4 दिवस राज्याच्या ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

रेडीरेकनर दर म्हणजे काय?

रेडीरेकनर दर म्हणजे एखाद्या जागेची सरकारच्या दृष्टीने निश्चित केलेली किमान किंमत होय. खरंतर रेडीरेकनर ही स्थावर मालमत्तांची राज्य प्रशासनाने निश्चित करण्यात आलेली किंमत असते. याच किंमतीवर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क राज्य सरकार घेते.

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *