Rain Update

Rain Update । राज्याच्या विविध भागात रिमझिम पाऊस सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हवामान

Rain Update । सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले पाहायला मिळत आहे. दरम्यान आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्याचा चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होत आहे. (Rain Update)

मुंबईसह ठाणे, पालघर, परभणी, हिंगोली, नंदुरबार, अहमदनगर, वर्धा, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सकाळपासून पावसाला सुरवात झाल्यामुळे शेती पिकांना जिवनदान मिळणार आहे. पाण्याअभावी शेतकऱ्याची उभी पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र थोड्याफार पडणार्‍या पावसामुळे पीक पुन्हा चांगली बहरण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये नदी नाल्यांना पूर

पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज देखील काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर यायला सुरुवात झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याकडून उद्या पालघर जिल्ह्याला देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तर जास्त दिलासा मिळाला आहे. सध्या कापसाला फुल आली असून पाण्याअभावी ही फुलं गळती होत होती. मात्र आता पावसाने काही प्रमाणात फरक होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण देखील पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *