Rain Update

Rain Update । बिग ब्रेकिंग! ‘या’ १९ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

हवामान

Rain Update । संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ (Rain In Maharashtra) घातला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आणखी दिवस पावसाचा असाच कहर (Heavy Rain In Maharashtra) सुरु राहणार असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते, परंतु यावर्षी चित्र काहीसे वेगळे आहे.

Tur Market । शेतकऱ्यांना तुरीमुळे अच्छे दिन! नवीन तुरीला मिळणार ‘इतका’ भाव

१९ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा

राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडत असणाऱ्या (Rain Update) पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता पावसाबाबत हवामान खात्याने मोठे अपडेट (Weather Report) दिले आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून (IMD Rain Alert) देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.

Cultivation of silk । रेशीम लागवडीसाठी मिळतंय पावणे दोन लाखांचं अनुदान, जाणून घ्या योजना

या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक, सातारा आणि सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (IMD Update) पडू शकतो. हवामान खात्याच्या पावसाबाबतच्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पाडली आहे. शेतीचे आणखी नुकसान होऊ शकते.

Success story । गलेगठ्ठ पगारावर पट्ठ्याने मारली लाथ! वाटाणा शेती करून कमावले 5 कोटी; जाणून घ्या कस केलं नियोजन?

तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. परंतु, या पावसामुळे रब्बी पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तळ गाठलेल्या विहरी गच्च भरल्या आहेत.

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अंदाजानुसार बाधित क्षेत्राचा आकडा वाढू शकतो. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका काही जिल्ह्यांना बसणार असल्याने हवामान खात्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. अवकाळी पावसाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच राज्यात रविवारपासून पाऊस उघडीप देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *