Rain Gauge

Rain Gauge । राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत बसणार पाऊस मोजण्याचे यंत्र, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

बातम्या

Rain Gauge । जिल्ह्यात गावोगावी पडणाऱ्या पावसाची अचूक मोजणी (Rain Update) व्हावी आणि तेथील पर्जन्यमानाच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व अतिरिक्त मार्गदनर्शन मिळावा यासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात येणार आहे. जिल्ह्यात पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मंडळनिहाय पाऊस मोजला जातो. त्यामुळे त्या त्या भागातील पावसाची अचूक नोंदणी होतेच असे नाही.

Agricultural Exhibition । शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी! ‘या’ ठिकाणी २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शन!

परंतु, ग्रामपंचायत क्षेत्रात पाऊस मोजण्याचे यंत्र बसवले तर तेथील दैनंदिन पावसाच्या अचूक नोंदी घेण्यास मदत होईल. राज्यातले सरकार राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यामध्ये एकूण तीन हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये ही उपकरणे बसवले जाणार आहे.

Tur Market । शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकार करणार बाजारभावाने तूर खरेदी

कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

याबाबत हिवाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी माहिती दिली. पावसाचे मोजमाप आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची अचूक माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यानुसार निर्णय घेता येईल. जर पर्जन्यमापक यंत्र बसवले तर शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, याशिवाय राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबवले जाणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले आहे.

Success Story । ऑनलाईन हुरडा विकून मराठवाड्यातील तरुण करताहेत लाखोंची उलाढाल, अशी केली सुरुवात

नमो किसान महासन्मान योजना

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि शिवरायांच्या शेतकरी धोरणावर हे सरकार प्रामाणिकपणे काम करत असून शेतकऱ्यांना दोन्ही हातांनी मदत करण्यासाठी कटिबद्ध असलेले हे सरकार आहे. राज्यात नमो किसान महासन्मान योजनेच्या (Namo Kisan Mahasanman Yojana) पहिल्या सहामाहीत एकूण 86 लाख शेतकऱ्यांना 1720 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. निकषांमुळे कोणतीही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी संपूर्ण राज्यात चार महिने विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

Success Story । उच्च शिक्षित तरुणाची लै भारी कमाल, शिमला मिरचीतून मिळवला बक्कळ नफा

दरम्यान, पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागतो. आतापर्यंत 52 लाख शेतकर्‍यांना 25% आगाऊ दावा म्हणून 2216 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे, त्यापैकी 1700 कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. तर उरलेली रक्कम वितरित करण्यात येत आहे.

Subsidy for Well । मोठी बातमी! आता विहिरीसाठीही मिळेल अनुदान, ग्रामपंचायतीत द्यावा लागेल प्रस्ताव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *