Property Act । साठेखतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केली तर एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क खरेदीदाराला मिळतो. तसेच विकणाऱ्याला देखील संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. महत्त्वाचे म्हणजे दोघांनी जर संबंधित अटी आणि शर्ती पूर्ण केल्या त्या मिळकतीचे खरेदीखत होऊन खरेदीदाराला त्या मिळकतीचा ताबा दिला जातो.
Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक विम्यात केला ‘या’ फळांचा समावेश
काय आहे साठेखत?
साठेखत (Sathekhat) म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम ५४ नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा एक महत्त्वाचा करार आहे. जर हा करार झाला तर खरेदीदाराला कसलाही हक्क, बोजा वा हितसंबंध निर्माण होत नाही. साठेखत (Deposite) एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो. तो मौखिक किंवा लिखित स्वरूपात असू शकतो. साठेखत रद्द करण्यासाठी दोन्ही व्यक्तींची संमती गरजेची असते. (What is Sathekhat)
साठेखत का महत्त्वाचे आहे?
जमिनीचे अथवा मिळकतीचे हस्तांतरण अनेकदा लवकर मिळत नाही. त्यामुळे या व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी साठेखत करतात. समजा संबंधित जमीन भोगवटादार-२ ची असल्यास तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तिची विक्री करता येत नाही. भाडेपट्टा, गहाण, दान किंवा कुठल्याही प्रकारचे जमिनीचे हस्तांतरण देखील कोणाला करता येत नाही.
Jivamrit preparation । शेतकरी बांधवांनो! घरबसल्या २ मिनिटात तयार करा जीवामृत, जाणून घ्या पद्धत
तसेच अनेकवेळा खरेदीदार कर्ज काढून मालमत्ता घेतो. अशावेळी कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्त्तीच्या नावे मालमत्तेची कागदपत्रे किवा करार करावा लागतो. अशावेळी साठेखत करतात. ज्यावेळी खरेदीदाराला कर्ज मिळते त्यावेळी उरलेली रक्कम देऊन खरेदीखत करतात.