Pomegranate cultivation

Pomegranate cultivation । शेतकऱ्याने करून दाखवलं! डाळिंब लागवडीतून 50 टनाचे उत्पादन घेत कमावले 70 लाख रुपये

यशोगाथा

Pomegranate cultivation । शेतकरी दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन बदल करून शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून भाजीपाला लागवड तसेच फळ शेतीकडे वळले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. फळ शेतीमधून जास्त नफा मिळवता येतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांचा कल फळबाग लागवडीकडे वळला आहे. विशेष गोष्ट म्हणजे फळबाग लागवड करण्यासाठी शेतकरी देखील अनुदान देत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी फळबाग लागवडीचा विचार करतात. (Success Story )

मागच्या काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून त्यामधून चांगले उत्पन्न घेऊन लाख ते करोडो रुपये कमावले आहेत. अनेक शेतकरी फळबाग लागवड करतात त्याचे योग्य व्यवस्थापन करतात आणि त्यामधून चांगला नफा देखील कमवतात. सध्या देखील माळशिरस तालुक्यातील जांभूळ गावातील एका शेतकऱ्याने डाळिंबाच्या पंधराशे झाडावर जवळपास 40 ते 50 टन डाळींबाचे उत्पन्न घेतले आणि या डाळिंबामधून जवळपास 70 लाख रुपये कमावले असल्याची माहिती मिळत आहे. अण्णा पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

या शेतकऱ्याच्या डाळिंबाची विक्री 170 रुपये किलोनी करण्यात आलेली आहे. तर हा डाळिंब सध्या बांगलादेशात पाठवण्यात येत आहे. त्याचबरोबर अजूनही मागे काही डाळिंब झाडाला शिल्लक आहेत. त्यामधून जवळपास एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याचे अण्णा पाटील यांनी सांगितले आहे.

खर्च किती आला?

कोणतेही पीक घ्यायचे म्हटले तर त्यासाठी खर्च हा येतो तसेच या शेतकऱ्याला देखील डाळिंबाची लागवड करण्यासाठी चांगला खर्च आला आहे. या शेतकऱ्याला तीन हजार झाडाच्या लागवडीसाठी वर्षभरात जवळपास साडेचार लाख रुपये खर्च आल्याची माहिती स्वतः शेतकऱ्याने दिली आहे. मात्र उत्तम नियोजन आणि देखभाल करून कमी फवारणीत कमी, खर्चामध्ये या शेतकऱ्यांने बागेची देखभाल केली आणि त्याला उत्पन्न देखील चांगलं मिळत असल्याचे शेतकऱ्यांने सांगितल आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सगळीकडे आता कौतुक देखील केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *