PM Surya Ghar Yojana । सर्वसामान्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. अशातच आता सरकारने आणखी एका योजनेला सुरुवात केली आहे. सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Free Power Scheme) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. (Free Power Scheme)
Farmers Protest । दिल्लीच्या सीमेवर तणाव वाढला, पोलिसांनी सोडल्या ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या
होईल 18000 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक बचत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना रूफटॉप सोलर आणि मोफत वीज योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेद्वारे एक कोटी घरांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवली जाईल, असे सांगितले होते. या योजनेद्वारे एक कोटी कुटुंबांची वार्षिक 15 ते 18 हजार कोटी रुपयांची बचत होऊन ते अतिरिक्त विजेची वीज वितरण कंपन्यांना विक्री करू शकतील.
Crop Insurance Scheme । धनंजय मुंडे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
नरेंद्र मोदी यांनी दिली सोशल मीडियावर माहिती
या नवीन योजनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिली आहे. “75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या या योजनेचे उद्दिष्ट प्रत्येक महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून 1 कोटी घरांना प्रकाश देणे आहे. पीएम मोदी पुढे म्हणाले की, या योजनेंतर्गत सबसिडीपासून मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत सर्व काही देण्यात येईल.
काय आहे योजना?
या योजनेचा लाभ एक कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार आहे. याअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रत्येक महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. जर घरांच्या छतावर सौर पॅनेल लावले तर सरकार 60% पर्यंत सबसिडी देईल. या योजनेसाठी सुमारे 75,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या योजनेमुळे केवळ वीज बिल कमी होणार नाही तर ऊर्जा सुरक्षा, प्रदूषण कमी आणि रोजगार निर्मितीमध्येही मोठी मदत होणार आहे.
असा करा अर्ज
- सर्वात अगोदर तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in/ पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमची राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागणार आहे. त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेलची माहिती द्यावी लागणार आहे
- यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक आणि मोबाइल नंबरसह लॉग इन करावे लागणार आहे. लॉग इन केल्यानंतर, रूफटॉप सोलर फॉर्मद्वारे अर्ज द्या.
- Discom कडून व्यवहार्यता मंजुरी मिळताच तुम्ही तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणी केलेल्या कोणत्याही विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करून घेऊ शकता.
- इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
- नेट मीटरची स्थापना केल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे पडताळणी करून पोर्टलवरून एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करण्यात येईल.
- कमिशनिंग अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक जमा करा. यानंतर, तुमची सबसिडी बँक खात्यात 30 दिवसांच्या आत प्राप्त होईल.
Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा