Pm Kusum Yojna

PM Kusum Yojna । पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक; केंद्र सरकारचा इशारा, वाचा महत्त्वाची माहिती

शासकीय योजना

PM Kusum Yojna । केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने फायदा व्हावा म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांचा शेतकरी देखील लाभ घेत असतात. यामध्ये पीएम किसान योजना असेल पीएम कुसुम योजना असेल अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबवल्या आहेत. यामध्ये जर आपण पीएम कुसुम योजना विषयी पाहिले तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

Maharashtra Rain Update । राज्यभर पावसाचे पुनरागमन, मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना यासाठी एक वेबसाईट देखील जारी केली आहे. https://pmkusum.mnre.gov.in/landing.html यावर पात्र शेतकरी अर्ज करू शकतात. मात्र आता यामध्ये देखील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. हे पाहता केंद्र सरकारकडून फसव्या वेबसाईटची माहिती देण्यात आली आहे.

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस, राज्यात पुढील 48 तास पावसाचे; हवामान विभागाने दिला इशारा

केंद्र सरकारने पीएम कुसुमच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे की, अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन पीएम कुसुम योजना या नावाने सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज मागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पैसे देखील घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा वेबसाईटवर जाऊ नये असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

Sarkari Yojna । सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार रासायनिक खते

जर शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा या योजनेस संबंधित काही तक्रार करायची असेल तर शेतकऱ्यांनी नवकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या Www.mnrega.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा टोल फ्री नंबर १८००१८०३३३३ वर डायल करा.

Soybean Rate । सोयाबीनचे भाव वाढले का? पाहा बाजारातील स्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *