PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत शेती करावी लागते. त्यातून दरवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळेलच असे नाही. अनेकदा शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना हतबल व्हावे लागते. काही जण आर्थिक संकट आल्याने निराश होऊन टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने विविध योजनांना (Government Schemes) सुरुवात केली आहे.
त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) होय. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी यावी, यासाठी सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात सरकारने या योजनेचा 15 हप्ता जारी करण्यात आला. शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana Rules)
सरकारने आतापर्यंत 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत. आता या योजनेअंतर्गत वडील आणि मुलगा दोघेही PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? असा सवाल उपस्थित केला जातो. दरम्यान, लाभार्थींबाबत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नियम काय आहे? जाणून घेऊयात.
Government Schemes । मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
काय आहे नियम?
या योजनेच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकतेच केंद्र सरकारकडून पीएम किसानच्या नियमांबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार, देशातील अनेक लोक पात्र नसताना पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी.
Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच वर्षांत दहा लाख सिंचन विहरींचे उद्दिष्ट
अशी तपासा लाभार्थी यादी
- PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
- तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
- या ठिकाणी Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. पुढे एक नवीन पेज उघडेल.
- पुढे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी पर्याय निवडा.
- या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही ते पाहू शकता.
- तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करून Get Data वर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती येईल.
- तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असल्यास तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे, हे लक्षात ठेवा.
Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान