PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या

शासकीय योजना

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी लाखो रुपयांचं उत्पन्न घेत असतात. पण काही शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याचा समस्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने योजना (Schemes for farmers) राबवायला सुरुवात केली आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Govt Schemes)

Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या ‘ही’ आंतरपिके; अवघ्या 3 महिन्यात होईल लाखोंची कमाई

पंतप्रधान किसान सन्मान योजना

सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेची (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) सुरुवात केली आहे. देशातील करोडो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. केंद्र सरकार प्रत्येक दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये हस्तांतरीत करत असते. (PM Kisan Samman Yojana)

Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

केंद्र सरकारने या योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे शेतकरी 16 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, असे या योजनेचे (PM Kisan Samman Nidhi) मुख्य उद्दिष्ट्य आहे. अशातच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

या दिवशी खात्यात येणार पैसे

कारण आता येत्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. हे लक्षात घ्या की केवळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा की पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC बंधनकारक असणार आहे.

Farmers Protest । विविध मागण्यांवर शेतकरी ठाम! देशभरात काढणार कँडल मार्च, सरकारचाही पुतळा जाळणार

OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध असून किंवा तुम्ही बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकता. तुम्हाला EKYC करावी लागणार आहे, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर eKYC करून घ्या.

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *