Pm Kisan yojna

PM Kisan 16th Installment । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 16 वा हप्ता

शासकीय योजना

PM Kisan 16th Installment । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government Schemes) सुरु करत आहे. या योजनांचा त्यांना लाभ होतो. यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) होय. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत 6 हजार रुपये जमा करत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्त्यांचा (PM Kisan 15th Installment) लाभ मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.

Agriculture Machine । हे एकच यंत्र करतंय शेतातील अनेक कामे, जाणून घ्या किंमत; पाहा Video

दरम्यान, DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. केंद्राने नोव्हेंबर महिन्यात 15 वा हप्ता (PM Kisan) जमा केला होता. शेतकरी 16 व्या हप्त्याची (PM Kisan 16th Installment Date) आतुरतेने वाट पाहत आहेत. हे लक्षात घ्या की ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. (PM Kisan Yojana)

Most Expensive Potato । जगातील सर्वाधिक महागडं बटाटे, सोने-चांदीपेक्षाही आहे महाग; किंमत जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

इतकेच नाही तर 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना देखील या योजनेचा फायदा मिळत नाही. तसेच इनकम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींनाही योजनेचा लाभ मिळत नाही. पुढील हप्ता केव्हा जमा होईल याची अजूनही अधिकृत घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेतंर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

Success Story । गलेगठ्ठ पगार असणाऱ्या नोकरीवर मारली लाथ, लिंबाच्या बागेतून शेतकरी करत आहे लाखोंची कमाई

असा करा 16 व्या हप्त्यासाठी अर्ज

• 16 व्या हप्त्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.

• पुढे नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करून आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि कॅप्चा भरा

• आता तुमचा संपूर्ण तपशील भरून ‘होय’ वर क्लिक करावे.

• अर्जात विचारण्यात आलेली माहिती भरून अर्ज जमा करा.

Success Story । ऊस उत्पादकाची कमाल! अवघ्या 18 गुंठ्यात 57 टन घेतले उत्पादन, कसं केलं नियोजन? जाणून घ्या

अशी तपासा स्थिती

• स्थिती तपासण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट द्या

• आता ‘शेतकरी कॉर्नर’ विभागांतर्गत ‘लाभार्थी स्थिती’ पर्यायाची निवड करा.

• तुमचे नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते नंबर प्रविष्ट करा.

• पुढे ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा तुम्हाला हप्त्याची स्थिती पाहायला मिळेल.

Agri Schemes । शेती अवजारांच्या अनुदान योजनेतील गैरप्रकाराला बसणार आळा, जाणून घ्या सरकारची भन्नाट आयडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *