Pipeline Subsidy

Pipeline Subsidy । आता पाईपलाईनसाठी मिळेल 50% अनुदान, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?

शासकीय योजना

Pipeline Subsidy । शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. अनेक शेतकऱ्यांची विहीर, किंवा शेततळे शेतापासून दूर असते. त्यामुळे ते पाइपलाईन करतात. काही शेतकरी जमिनीखालून पाइपलाईन करतात तर काही शेतकरी जमिनीवरून पाइपलाईन करतात. वास्तविक पाईपलाईनसाठी (Pipeline) लाखो रुपयांचा खर्च येतो. प्रत्येक शेतकऱ्यांकडे लाखो रुपये असतातच असे नाही, ते कर्ज काढून पाईपलाईन करतात.

Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान

परंतु आता शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी 50% अनुदान (Pipeline Schemes) मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना (Government Schemes) राबवत असते. शेतीचे उत्पादन वाढावे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा हा या योजनांमागचा मुख्य उद्धेश आहे. मुबलक प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना (Pipeline Subsidy Scheme) होय.

Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

पाईपलाईन अनुदान योजना

पाईपलाईन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाईपलाईन अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येईल. अर्जदार शेतकऱ्यांना 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान मिळेल. दिले जाणारे अनुदान 50% किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत असेल. यासाठी देखील काही नियम आणि शर्ती आहेत.

Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध

कोणाला करता येणार अर्ज?

  • सातबारा उताऱ्यावर विहीरीची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल.
  • इतर कोणत्याही सिंचन सुविधेची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल.

Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन

आवश्यक कागदपत्रे

  • बँकेचे पासबुक
  • आधार कार्ड
  • पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र
  • सातबारा आणि आठ अ चा उतारा
  • पाईप खरेदी केल्याची बिले

Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार

अशी होते निवड

  • शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करतात.
  • निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येते.
  • त्यांनतर महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतात.

Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *