Pest Control

Pest Control | सावधान! उसातील ‘ही’ कीड वेळीच नियंत्रणात आणा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

कृषी सल्ला

Pest Control | शेतातील पिकांवर बऱ्याचदा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे पिकांचे नुकसान देखील होते, म्हणून पिकांवरील किडीचे योग्य व्यवस्थापन करून ती वेळीच आटोक्यात आणणे महत्त्वाचे असते. दरम्यान ऊस, ज्वारी आणि बाजरी या पिकांवर येणाऱ्या लोकरी मावा या किडीबाबत (Woolly aphids Pest) आणि या किडीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती घेऊयात.

Dairy Farming । ‘या’ आहेत गायींच्या टॉप 3 जाती आहेत, गोठ्यात आणाल तर मालामाल व्हाल; जाणून घ्या सविस्तर माहिती

Woolly aphids Pest | लोकरी मावा किडीबाबत माहिती

लोकरी मावा किडीचे शास्त्रीय नाव ‘सेराटोव्हॅकुना लॅनिजेरा’ असे आहे. ही कीड मुख्यतः ऊस, ज्वारी आणि बाजरी या पिकांवर आपली उपजीविका पूर्ण करते. ऑक्टोबर ते मे महिन्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ही रस शोषण करणारी कीड असून याच्या प्रादुर्भावाने पीकांच्या उत्पादनात घट होते. त्यातल्या त्यात ही कीड उसावर असेल तर उसाच्या उत्पादनात साधारण 20 टक्के आणि साखर उताऱ्यात 2.20 ते 3 टक्क्यांपर्यंत घट होण्याची (Loss in Procuction ) शक्यता असते.

Poultry Farming | सावधान! हिवाळ्यात कोंबड्यांची अशी काळजी घ्याच, अन्यथा निर्माण होईल धोका…

लोकरी मावा ही कीड पिले आणि प्रौढ या दोन अवस्थांमध्ये असते. वाऱ्यामार्फत या किडीचा प्रभाव होतो. तसेच ऊस वाहतुकीद्वारे सुद्धा ही कीड पसरू शकते. उन्हाळ्यामध्ये (Summer) असणाऱ्या दीर्घकाळ कोरड्या वातावरणात ही कीड जास्त कार्यक्षम असते.

Loss | किडीमुळे होणारे नुकसान

1) पिकाच्या पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषण करते.

2) पानांवर पिवळे ठिपके पडून ती वाळतात.

3) ही कीड शरीरावाटे मधासारखा गोड चिकट द्रव बाहेर टाकते. यावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये (PhotoSynthesis) अडथळा निर्माण होतो.

4) उत्पादनात घट होते.

Success Story | शेतकऱ्याचा नादच खुळा! शेळीपालनातून कमावले ५ कोटी रुपयांचे उत्पन्न

Management | लोकरी मावाचे व्यवस्थापन कसे करावे ?

लोकरी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीडग्रस्त शेतातील बियाणे लागवडीसाठी वापरू नये.

प्रादुर्भावग्रस्त पाने आणि वाळलेले पाचट काढून जाळून टाकावे.

बाधित ऊस आणि त्या ऊसातील वस्तू, ट्रॅक्टर वगैरे यांची वाहतूक प्रादुर्भाव नसलेल्या शेतात करू नये.

प्रादुर्भावग्रस्त ऊस जनावरांना खाऊ घालू नये.

जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

कीड टाळण्यासाठी औषध फवारणी

मेटाऱ्हायझीम ॲनिसोप्ली किंवा व्हर्टीसिलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यात 4 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.

प्रति हेक्टरी डीफा ॲफिडिव्होरा 1000 अळ्या किंवा मायक्रोमस इगोरोटस 2500 अळ्या किंवा क्रायसोपर्ला कार्निया या मित्र कीटकांची 2500 अंडी सोडावीत.

जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्यास डायमिथोएट (30 टक्के EC ) 1.5 मिलि प्रति लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारणी द्यावी.

Carrot Farming | गाजराची शेती करताय? तर ही माहिती नक्की वाचा आणि मिळवा भरघोस उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *