Peppermint Farming

Peppermint Farming । शेतकऱ्यांनो, पुदिना लागवड करून तुम्हीही कमावू शकता लाखो रुपयांचा नफा; जाणून घ्या कशी करावी लागवड?

कृषी सल्ला

Peppermint Farming । आता शेतकरी परंपरागत शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळू लागले आहेत. यासाठी विविध प्रकारचे पिके शेतकरी घेत असून या पिकांच्या माध्यमातून चांगला नफा मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शेतकरी लेमनग्रास आणि पुदिना सारख्या पिकांची लागवड करून चांगला नफा घेत आहेत. सरकार देखील या पिकांसाठी लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहेत.

Bank Loan । शेती कर्जाचे पुनर्गठन करायचंय? तातडीने करा हे काम, बंद होईल कर्ज वसुलीची कटकट

बाजारात याला चांगली मागणी आहे. मागणी जास्त असल्याने शेतमालाला भावही चांगला मिळतो, त्यामुळे पुदिन्याची लागवड (Peppermint Farming Cultivation) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. जर शेतकऱ्यांनी त्याची योग्य प्रकारे लागवड करून बाजारातील मागणीनुसार उत्पादन घेतले तर यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. बाजारात 100 ते 150 रुपये प्रति पाच किलो विकतो. तुम्हाला एका हेक्टरमध्ये 1 लाख ते 1.25 लाख रुपये नफा मिळेल.

Pipeline Subsidy । आता पाईपलाईनसाठी मिळेल 50% अनुदान, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?

हवामान आणि माती

पुदिन्याची लागवड करताना हवामान समशीतोष्ण हवामान, उष्ण व उपोष्णकटिबंधीय हवामान असावे. अतिशय थंडीचे महिने वगळता वर्षभर त्याची लागवड करता येते. तसेच पुदिन्याच्या लागवडीसाठी, ते खोल सुपीक जमिनीत घ्यावे. ज्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. पाणी साचलेल्या जमिनीत तुम्हाला पुदिन्याची लागवड (Peppermint Cultivation) करता येईल. लागवडीसाठी, जमिनीत ओलावा आणि मातीचे pH मूल्य 6 ते 7.5 इतके असावे.

Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान

सुधारित वाण

पुदिन्याच्या सुधारित वाणामध्ये एमएएस-1, कोसी, कुशल, साक्षम, शिवालिक, हिमालय, गौमती (एच.वाय. 77), एल-11813, शंकर 77, ई.सी. 41911 इत्यादी मुख्य वाण आहेत.

Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

अशी तयार करा जमीन

चांगला निचरा असणारी माती पुदिन्याच्या लागवडीसाठी उत्तम आहे. ज्याचे pH मूल्य 6 ते 7.5 दरम्यान असावे. तसेच पेरणीपूर्वी शेत नांगरून जमीन सपाट करून घ्यावी. शेवटची नांगरणी करताना हेक्टरी 10 टन कुजलेले खत मिसळणे गरजेचे आहे. यासोबत 50 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश शेतात टाका.

Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध

लागवड कालावधी

पुदिन्याच्या मुळांची लागवड करण्याचा कालावधी हा 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान आहे. हे लक्षात घ्या की पेरणी उशिरा झाल्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते. काही जाती अशा देखील आहेत ज्या तुम्ही मार्चपर्यंत लावू शकता.

Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन

शेती पद्धत

सर्वात अगोदर शेतातील लहान वाफ्यात पुदिना लावून त्याला नियमित पाणी द्यावे. मुळे थोडी मोठी झाल्यास ती आधी तयार केलेल्या शेतात लावा. या पद्धतीने पुदिन्याची लागवड केल्याने जास्त उत्पादन मिळते. जास्त उत्पादनासाठी शेतकऱ्यांना पुदिन्याच्या चांगल्या वाणांची निवड करावी लागते. असे केल्याने कमी वेळेत जास्त नफा मिळतो.

Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *