Papaya farming

Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया

यशोगाथा

Papaya farming । हल्ली शेतकरी फळबागांच्या माध्यमातून बक्कळ पैसे कमावत आहेत. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे नशीब रातोरात बदलत आहे. इतकेच नाही तर सरकार देखील फळबागांना अनुदान (Subsidy to Orchards) देत आहे. शेतकरी सरकारी अनुदानाचा (Government subsidy) लाभ घेऊन शेती करत आहेत. इतर पिकांपेक्षा या पिकाला जास्त मागणी असते, मागणी जास्त असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल

अनेक शेतकरी पपईचे उत्पन्न (Papaya yield) घेतात. अशातच, पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पपईचे (Papaya) भरघोस उत्पन्न घेतले आहे. त्याच्या या यशामुळे समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. (Papaya farming information) या शेतकऱ्याच्या पपईच्या एका झाडाला तब्बल २०० पेक्षा जास्त पपया लागल्या आहेत. भोर तालुक्याच्या वेळूमधील शेतकरी गुलाब महादेव घुले यांनी हे घवघवीत यश मिळवले आहे. (Papaya cultivation)

PM Kisan 16th Installment । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 16 वा हप्ता

अशी केली लागवड

विशेष म्हणजे घुले यांनी नैसर्गिक शेतीत जिवामृताच्या वापराने भरघोस उत्पादन घेतले असून त्यांनी साई हायटेक नर्सरी, सिंगापूर (ता. पुरंदर) या ठिकाणाहून जुलै २०२२ मध्ये एकूण ३५ रोपे आणली. शेताच्या बांधावर अर्धा फुटाचा खड्डा घेत त्यात कुजलेला पालापाचोळा, शेणखत आणि माती याचे मिश्रण करून खड्डे भरले. लागवड करत असताना जिवामृतामध्ये रोपांची मुळे बुडवून खड्ड्यात पपई लागण केल्याने किडीपासून बचाव झाला.

Agriculture Machine । हे एकच यंत्र करतंय शेतातील अनेक कामे, जाणून घ्या किंमत; पाहा Video

सहा महिन्यांत आली फुले

घुले यांनी लागवड केलेल्या पपईला सहा महिन्यांत फुले आली. ठिबक सिंचनाद्वारे पहिल्या तीन महिन्यांत आठवड्यातून एकदा अर्धा लीटर जिवामृतचा डोस आणि सहा महिने ते एका वर्षात महिन्यातून चारवेळा दोन लीटर जिवामृत दिले आहे. तसेच चार दिवसांतून एकदा पाणी दिले. दोन महिन्यांत पपईची दोन फुटांपर्यंत वाढ झाल्यावर पपईची छाटणी केली.

Most Expensive Potato । जगातील सर्वाधिक महागडं बटाटे, सोने-चांदीपेक्षाही आहे महाग; किंमत जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

इतकेच नाही तर त्यांनी पपईच्या खोडापाशी सुकलेला पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, गुरांच्या उष्टावळ, भाताचा कोंडा, काड, पालापाचोळा, वाळलेले निकृष्ट गवत वापरून जमिनीचा पृष्ठभाग झाकल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी झाला आहे. मनात जर जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नसते हे घुले यांनी दाखवून दिले आहे.

Success Story । गलेगठ्ठ पगार असणाऱ्या नोकरीवर मारली लाथ, लिंबाच्या बागेतून शेतकरी करत आहे लाखोंची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *