Papaya Cultivation

Papaya Cultivation । ‘या’ पद्धतीने करा पपईची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

कृषी सल्ला

Papaya Cultivation । फळबाग लागवडीमधून चांगला नफा मिळतो म्हणून अनेक शेतकरी फळबाग लागवड करत आहेत . वेगवेगळ्या फळांची लागवड करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊन चांगला नफा कमवत आहेत. यामध्येच शेतकरी पपईची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र कोणत्याही फळाची लागवड करायची झालं तर त्याचे योग्य नियोजन असणे खूप गरजेचे असते. जर योग्य नियोजनाने आपण त्याची लागवड केली तर आपल्याला त्यामधून नफा देखील चांगला मिळतो आज आम्ही तुम्हाला पपईच्या लागवडीबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

Rain Update । उद्याही राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार का? घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवामान विभागाचा महत्वाचा अंदाज

पपईची लागवड ही वर्षभरात जून-जुलै सप्टेंबर आणि फेब्रुवारी- मार्च या तीन हंगामामध्ये केली जाते. जर तुम्ही द्विलिंगी जातीच्या पपईची बागेमध्ये लागवड करत असाल तर त्यामध्ये १० टक्के नर झाडांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उभयलिंगी जातीची लागवड करत असाल तर प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.

Power Tiller । नांगरणीपासून ते औषध फवारणीपर्यंत शेतीची कामे होणार सोपी! पॉवर टिलर बनला बळीराजाचा साथी

पपई लागवड करण्या अगोदर तुम्हाला जमिनीची मशागत करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा तुम्ही जमीन नांगरावी त्यानंतर दोन ते तीन वेळा जमिनीला पाळी मारून घ्यावी आणि जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर एकरी सिंगल सुपर फॉस्फेट – १ बॅग (५० किलो) जय संजीवनी – ५ किलो हे घटक शिंपडुन पुन्हा एकदा पाळी मारून घ्यावी. असे केल्यास पपईचे उत्पादन चांगले निघेल.

घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती

रोपांची निवड कशी करावी

उत्पादनासाठी तुम्ही को २, पुसा मॅजेस्टी किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही जातीचे रोपे तुम्ही निवडू शकता. पपई लागवड करण्यासाठी लागणाऱ्या रोपांचे प्रमाण त्यांच्या अंतरावर अवलंबून असते. यामध्ये काही शेतकरी बियांपासून रोपे तयार करतात तर काही शेतकरी थेट नर्सरी मधील रोपे आणून पपईची लागवड करतात.

Jalna News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्याने तुरीच्या शेतामध्ये केली एक एकर गांजाची लागवड; पोलिसांनी छापा मारत केली मोठी कारवाई

पपई लागवडीचा योग्य कालावधी कोणता?

कोणत्याही पिकाची जर योग्य काळात लागवड झाली तर त्यामधून उत्पादन देखील चांगलेच मिळते. योग्य काळात लागवड केल्याने रोगराई जास्त पडत नाही. त्यामुळे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात निघते, पपईची लागवड पाहिली तर जून-जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्च या तीन हंगामात केली जाते यामध्ये फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केल्यास ती शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते. यावेळीरिंग स्पॉट या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा उशिरा होतो.

Online Valu Booking । घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे असेल तर, ‘या’ पद्धतीने करा शासकीय वाळूचे बुकिंग

पपईमध्ये आंतरपीक घ्यावे की नाही?

शेतकरी डाळिंब, पेरू, सिताफळ, पपई याची लागवड करतात आणि त्यामध्ये छोटी आंतरपीके घेत असतात, यामधून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. मात्र पपई मध्ये आंतरपीक घ्यावे का? शक्यतो तर पपईमध्ये आंतरपीक घेणे टाळावे मात्र जर तुमच्याकडे शेतजमीन कमी असेल आणि तुम्हाला आंतरपीक घ्यायचे असेल तर सुरुवातीच्या सहा ते आठ महिन्याच्या काळात चवळी, उडीद, मूग, कांदा, मुळा यांसारखी पिके घ्यावीत.

Vermicompost । ‘या’ सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करा गांडूळखत, वाचा सविस्तर माहिती

पाणी व्यवस्थापन कसे करावे?

जर तुम्ही पपई लागवड उन्हाळ्यामध्ये केली असेल तर आठवड्यातून एकदा पाणी द्यावे आणि जर हिवाळ्यामध्ये केली असेल तर दहा दिवसांनी पाणी द्यावे. जर योग्य पाणी व्यवस्थापन केले तर तुम्हाला त्यामधून उत्पादन देखील चांगले मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *