Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी वर्तवला आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस काढणीसाठी आले आहेत. मात्र पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस काढता येत नाही मात्र २ ऑक्टोबरनंतर सूर्याचे दर्शन होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)
या भागात कोसळणार मुसळधार पाऊस
२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील महाबळेश्वर, कोल्हापूर, कोकणपट्टी, पुणे आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाबळेश्वर, शिर्डी, श्रीगोंदा, बारामती, नांदेड, सांगली, सोलापूर, पंढरपूर, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये फक्त ३ दिवस जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार असल्याचे चित्र दिसणार आहे. त्याचबरोबर २ ऑक्टोबरला सूर्यदर्शन झाले तरीदेखील ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर मध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, नागपूर, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि लातूरच्या उदगीर भागामध्ये पाऊस पडणार आहे.
Success Story । मेहनतीच्या जोरावर दाखवले करून! छायाताई दुग्ध व्यवसायात कमवताहेत बक्कळ पैसा
सध्या शेतकरी सोयाबीन काढण्याची घाई करत आहेत अशा शेतकऱ्यांनी ३ दिवसांनी सोयाबीन काढणीस सुरुवात करावी कारण की, ३ दिवसानंतर पावसाचा जोर कमी होणार असून सूर्याचे दर्शन होणार आहे. त्यामुळे सोयाबीन काढण्यास जास्तीचा त्रास होणार नाही. पावसामुळे सोयाबीन भिजण्याची भीती देखील राहणार नाही त्यामुळे १ ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यास सुरुवात करावी.