Organic Vegetables

Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ

सेंद्रीय शेती

Organic Vegetables । भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. समजा पिकांवर कोणता रोग पडला तर शेतकरी तातडीने रासायनिक खतांचा वापर करतात. यामुळे पिकांवरील रोग लवकर दूर होतो. परंतु रासायनिक खतांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. सध्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक खतांमुळे (Chemical fertilizers) देखील आजारात वाढ होऊ लागली आहे. म्हणून अनेकजण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या खातात.

Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ

राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना

सेंद्रिय भाज्यांमुळे केवळ लोकांचे आरोग्य नाही तर जमिनीचे आरोग्य चांगले राहते. महत्त्व लक्षात घेता काहीजण सेंद्रिय पद्धतीने शेती (Organic fertilizers) करत आहे. आता सेंद्रिय शेती करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सेंद्रिय भाजीपाला शेतकऱ्यांनी पिकवून सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढावे, यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

Success Story । काय सांगता! दोन एकरात 11 प्रकारची पिकं, ही महिला वर्षाला कमावतेय 7 लाख रुपये

या योजनेमध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते. ही योजना आणखी लोकप्रिय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. स्वनिधीतून 29 लाखांची तरतूद केली आहे. हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला जास्त पिकवला जातो. त्यामुळे कृषी विभागाने सर्वात जास्त आर्थिक उद्दिष्ट दोन तालुक्यांना दिली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

Success Story । हा पठ्ठया वयाच्या २३ व्या वर्षी करतोय गावरान कोंबड्या पाळून करोडोंची कमाई, कसं ते जाणून घ्या..

रासायनिक औषधांचा वापर

खरंतर रासायनिक पिकांमुळे भाजीपाला (Chemical Vegetables) लवकर पिकतो, त्याची वाढ जास्त होते शिवाय जास्त वजनामुळे फायदा देखील होतो. परंतु रासायनिक पिकांमुळे लोकांचे आरोग्य खराब होत चालले आहे. त्यांना अनेक आजार होतात. काहीजण तर पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करतात. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्या असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

या योजनेचे कीटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला असे स्वरूप आहे. यामध्ये कोबी, वेलवर्गीय काकडी, टोमॅटो, दोडका, कारली भाजीपाला आणि मिरची यांचा समावेश आहे. प्रत्येक भाजीपाल्यासाठी वेगवेगळे घटक असणारी किट आहेत. ही किट शेतकऱ्यांनी खरेदी करावी लागणार आहेत. त्याचे शेतकऱ्यांना अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जाईल. लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या.

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *