Organic Farming

Organic Farming । सेंद्रिय शेतीसाठी सरकार देतंय 70 हजार ते 25 लाखापर्यंत अनुदान! त्वरित घ्या लाभ

सेंद्रीय शेती

Organic Farming । शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रसायनांचा (Chemicals) सर्रास वापर केला जात असल्याने यामुळे जमिनीतील उत्पन्नाची ताकद कमी होत आहे. लोकांच्या आरोग्यावर या रसायनांचा विपरीत परिणाम होत आहे. फळे, भाजीपाला आणि धान्यांमध्ये काही प्रमाणात खते आणि कीटकनाशके शिल्लक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

Animal Husbandry Schemes । शेवटची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी उरला फक्त १ दिवस

यामुळे शेतकरी सेंद्रिय शेती (Organic agriculutre) करत आहेत. शिवाय सरकार सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेला (Government Subsidy) 2022-23 मध्ये सुरुवात केली आहे. योजनेला 2027-28 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेचे नाव बदलून ते डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असे केले आहे. (Organic Farming Subsidy)

Success Story । शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीतून कमावतोय लाखो रुपये, असं केलं नियोजन

जाणून घ्या उद्दिष्ट

जे क्षेत्र नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करण्याकरिता निवडले जाईल त्या ठिकाणी रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवून त्या ठिकाणाच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी व त्या माध्यमातून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.

Land Rights । कामाची बातमी! बांधावरील जमिनीच्या वादावर निघाला मार्ग, मोजणीसाठी ‘हे’ यंत्र ठरतेय फायदेशीर

अशी होते शेतकऱ्यांची निवड

सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणारे शेतकरी, सेंद्रिय शेती बद्दल जागृत असणारे शेतकरी, सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण घेऊन योजनेस सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी, सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणारे शेतकरी, सेंद्रिय शेती अंतर्गत प्रमाणिकरणासाठी आवश्यक शेती पद्धतीचा स्वतःहून अवलंब करणारे शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील त्या त्या जिल्ह्यातील या प्रवर्गाच्या शेतकऱ्यांच्या प्रमाणात शेतकऱ्यांची निवड केली जाते.

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

किती मिळणार अनुदान?

  • शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे तसेच त्यांच्या प्रशिक्षणाकरिता एक लाख रुपये अनुदान मिळेल.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्र विस्तार आणि शेतकरी प्रशिक्षणाकरिता 70 हजार रुपये अनुदान मिळेल.
  • सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करण्याकरिता पाच लाख रुपये अनुदान मिळेल.
  • शेतकरी गट स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र दोन लाख रुपये अनुदान दिले जाईल.
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना पणन सुविधा करिता अर्थसहाय्य म्हणून पाच लाख रुपये अनुदान मिळेल.
  • तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कल्चर निर्मिती केंद्र, प्रात्यक्षिक, शेतकरी आणि कर्मचारी प्रशिक्षणाकरिता 25 लाख रुपये अनुदान मिळेल.
  • शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र पाच लाख रुपये अनुदान मिळेल.

Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *