Online Valu Booking

Online Valu Booking । घर बांधण्यासाठी वाळू पाहिजे असेल तर, ‘या’ पद्धतीने करा शासकीय वाळूचे बुकिंग

बातम्या शासकीय योजना

Online Valu Booking । प्रत्येकाला आपले स्वप्नातले घर बांधायची इच्छा असते. त्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत करतात. परंतु पूर्वीसारखे घर बांधणे सोपे राहिले नाही. अलीकडच्या काळात घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागत आहेत. घर बांधण्यासाठी वाळू खूप महत्त्वाची असते. वाळूची होणारी तस्करी, भ्रष्टाचारामुळे वाळू व्यवसाय धोक्यात आला आहे.

Pm Kisan Yojna । ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा १५वा हप्ता; समोर आली मोठी अपडेट

या व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु हा व्यवसाय अनेक ठिकाणी अनधिकृतपणे चालतो. नियमात बदल केले तरीही त्यात कोणताच बदल झाला नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या नवीन धोरणांनुसार सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपये ब्रास वाळू खरेदी करता येणार आहे.

Fenugreek Rate । मेथीच्या जुडीला मिळतोय बाजारात चांगला भाव; मेथी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

तर 1000 रुपयाच्या आतच वाहतुकीसह 1 ब्रास वाळू मिळणार आहे. इको सेनेस्टिव्ह झोनमध्ये सुद्धा याच दराने वाळू उपलब्ध करून दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर कोणी अवैध वाळू उपसा केला तर थेट मोक्का कारवाई केली जात आहे. तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने वाळू बुक करू शकता. कसे ते जाणून घ्या.

Havaman Andaj । राज्यातील ‘या’ भागामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

फॉलो करा या स्टेप

  • सर्वात अगोदर महाखनिजच्या mahakhanij.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर Sand Booking या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढे Login ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड विचारण्यात येईल. जर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड नसेल तर तो नवीन तयार करा. तुम्ही जर पोर्टल वर नवीन असाल तर तुम्हाला तुमचं युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी Consumer Sign Up ऑपशन वर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
  • आता तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकून सबमिट करा. तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
  • तुमच्या ई-मेलवर आलेल्या लिंकवर जाऊन नवीन पासवर्ड तयार करा. किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर व ओटीपी सह लॉगिन (USE OTP) करून
    पासवर्ड तयार करता येईल. त्यानंतर Login करा.
  • प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी उजव्या बाजूला दिलेल्या edit ऑप्शन वर क्लिक करा.
  • प्रोफाइलमध्ये तुमची माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर, तुमचा जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड अशी माहिती टाका.
  • त्यानंतर रेशन कार्ड, पॅन कार्ड, आणि आधार कार्ड फोटो अपलोड करा फोटो अपलोड करा. समजा तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा GST नंबर ही तुम्ही देऊन Update वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला Register Project या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. यात तुम्ही कोणत्या घर/बिल्डिंग साठी वाळू बुक करणार आहात याबाबत माहिती असते.
  • त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट कशासाठी करत आहात जसे की स्वतःच घर, घरकुल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे ते सिलेक्ट करा. समजा तुम्ही स्वतःच्या घराचे प्रोजेक्ट करत असाल तर तुमचे नाव, पत्ता वगैरे सर्व माहिती टाका.
  • तसेच तुम्हाला किती वाळू लागेल ते टाकून साईटचा पत्ता टाका. येथे मॅप वरून देखील डायरेक्ट तुमचे लोकेशन टाकून नंतर Submit वर क्लिक करा.
  • पुढे वाळू बुक करण्यासाठी Book Sand वर क्लिक करा.
  • वाळूचा डेपो तुमच्या पासून किती किलोमीटर लांब आहे ते अंतर टाकून Search वर क्लिक करा.
  • तुम्ही सर्च केलेल्या ठिकाणी डेपोत वाळू नसल्यास तुम्हाला येथे काहीच माहिती दाखवली जाणार नाही.
  • स्टॉकची माहिती दिसेल त्यावर क्लिक करा. तुमच्या समोर एक स्क्रीन ओपन होईल त्यात बुकिंगची माहिती तपासून Confirm Booking वर क्लिक करा.
    सगळ्यात शेवटी तुम्हाला पेमेंट करावे लागेल.
  • Track order च्या साहाय्याने तुम्हाला ऑर्डर केलेल्या लोकेशन समजेल किंवा Transporter या ऑप्शनमध्ये तुम्हाला वाळू ट्रान्सपोर्ट करणाऱ्याला कॉल करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *