Onion Subsidy

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

शासकीय योजना

Onion Subsidy । कांदा हा नाशवंत आहे. कांद्याचे उत्पादन साठवूण ठेवणे खूप महत्वाचे आहे. कांद्याची योग्य साठवणूक झाली तर योग्य दर मिळतो. कांद्याची योग्य प्रकारे साठवणूक केल्याने योग्य वेळी त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. शेतकरी कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता सरकार कांदा चाळ उभारण्यासाठी 75% अनुदान (Subsidy) देत आहे.

Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत

काय आहे कांदा साठवण गृह?

कांदा साठवणूक गृह म्हणजेच कांद्याचे कोठार किंवा कांदा चाळ (Onion Subsidy Information) होय. यामध्ये तुम्ही कांदे खराब होऊ नये म्हणून जास्त वेळ ठेवता येते. याचा सर्वात मोठा फायदा कांदा शेतकर्‍याला हा आहे की तो कांदा चांगला झाल्यावर त्याच्या इच्छेनुसार कांद्याची विक्री नफा मिळवू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा साठवणूक गृह बांधण्यासाठी आता राज्य सरकारकडून 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही फक्त 25 टक्के रक्कम खर्च करून कांदा साठवणूक गृह बांधू शकता.

Narendra Modi । शेतकऱ्यांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडणार २ हजार रुपये; जाणून घ्या तुमच्या खात्यात येणार का?

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे पॅनकार्ड, रेशनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी पत्ता, ईमेल आयडी, आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक, कोल्ड स्टोरेजसाठी वापरलेल्या जमिनीचा तपशील असावे लागते.

Havaman Andaj । पुढील 4 दिवस राज्याच्या ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

असा घ्या लाभ

कादाचाळीचे बांधकाम करण्याअगोदर शेतकऱ्याने किंवा संस्थांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा आणि अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून घ्यावे लागते. त्यानुसार बांधकाम करावे लागते. त्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती सादर करावा.

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

  • वैयक्तिक शेतकऱ्यासाठी – 1. विहीत नमुन्यातील अर्ज.
  • अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन पाहिजे. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी कमीत कमी एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाहिजे. कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
  • वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी अनुदानास पात्र असतो, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करावी लागतात.
  • पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येतो.
  • समजा कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाला तर अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून केली जाते.
  • अर्जासोबत खर्चाची मुळ बिले आणि गोषवारा जोडावी.
  • अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो असावा.
  • कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील असावा.

PMFME Scheme । शेतकऱ्यांनो, सोडू नका ही संधी! अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळत आहे १० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *