Onion Rate

Onion Rate | दहा दिवसांत कांद्याच्या दरात सर्वाधिक घसरण, पाहा बाजारातील परिस्थिती

बाजारभाव

Onion Price । कांद्याने (Onion) यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याच्या दरावर (Onion rate) नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) केली आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना आणि कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे (Onion export) शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे.

Rabi Sowing । ज्वारीच्या क्षेत्रात वाढ! गहू, मका आणि हरभऱ्याचे क्षेत्र घटले

निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका

अशातच आता निर्यातबंदीनंतर अवघ्या दहा दिवसांतच कांद्याच्या दरात दोन हजारांची घसरण (Onion rate falls down) झाल्याचे पाहायला मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी गावरान तसेच लाल कांद्याला साडेतीन ते चार हजारांचा दर मिळत होता. परंतु आता हेच दर थेट दीड ते दोन हजारांवर आले आहे. शनिवारी नगर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची १ लाख ८ हजार गोण्या आवक झाली.

Government Schemes । पशुपालकांसाठी शेवटची संधी! 75 टक्के अनुदानावर घेता येणार विविध योजनांचा लाभ

पाहा बाजारातील परिस्थिती

पहिल्या प्रतीच्या कांद्याला १८५० ते २२५० रुपये, द्वितीय प्रतीला १०५० ते १८५०, तृतीय प्रतीस ६५० ते १०५०, तर चतुर्थ प्रतीस १५० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले आहेत. तर दुसरीकडे गावरान कांद्याची आवक रोडावली आहे. शनिवारी गावरान कांद्याची २ हजार ४५० गोण्यांची आवक असून यात प्रथम प्रतीस १६०० ते २१५०, द्वितीय प्रतीस ९०० ते १६००, तृतीय प्रतीस ५०० ते ९००, तर चतुर्थ प्रतीस ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत.

Milk Subsidy । लिटरमागे दुधाला ५ रुपये अनुदान द्या, दूध उत्पादकांची सरकारकडे मागणी

सरकारी निर्णयामुळे येत्या काळात दर आणखी कमी होतील या भीतीने शेतकरी लाल कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. परंतु,आवक वाढल्यामुळे त्याचा दरावर परिणाम होत आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी लाल कांद्याची आवक ही ५० ते ६० हजार गोण्या होती. परंतु आता त्यात वाढ होऊन ती एक लाखावर गेली आहे.

Electric Bull । काय सांगता? ‘हा’ इलेक्ट्रिक बैल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

कांद्याने केले शेतकऱ्यांचे वांदे

दरम्यान, शेतकरी दरवर्षी कांद्याला भाव असो किंवा नसो मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी मात्र कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केले आहेत. शेतकऱ्यांना कधी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी बाजारभावाचा फटका सहन करावा लागतो. यावर्षी राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेला कांदा कवडीमोल दरात विकावा लागत आहे.

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *