Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करावे या मुद्यांवरुन व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत नाशिक जिल्ह्यात लिलाव बंद केले आहे. याप्रश्नीआता तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीमध्ये मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीकडं राज्यातील बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. या मुद्यांवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
ट्विट करत त्यांनी लिहिले की, “केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीकडे महाराष्ट्रातून जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हि बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या बैठकीसाठी प्रमुख कांदा उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. जर आमंत्रित करुन देखील ते बैठकीला गेले नसतील, तर या बैठकीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे.
वास्तविक केंद्र शासनाच्या असंवेदनशील धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादकांची बाजू केंद्रात जोरकसपणे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी जाणे आवश्यक होते. परंतू या बैठकीला ते उपस्थित नसणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असे म्हणता येईल.असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीकडे महाराष्ट्रातून जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हि बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या बैठकीसाठी प्रमुख कांदा उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना… pic.twitter.com/Vu6sbWQWK0
— Supriya Sule (@supriya_sule) September 29, 2023