Onion Price Hike । मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरांवरून (Onion Price) राज्याचे राजकारण तापले आहे. कारण कांद्याला योग्य तो हमीभाव मिळत नाही. शिवाय सरकार कांद्याच्या किमतीवर (Onion Rate) नियंत्रण ठेवण्यासाठी हालचाली करत आहेत. एकंदरीतच सरकारविरोधात कांदा उत्पादकांचा रोष वाढला आहे. अशातच आता कांद्याबाबत (Onion) सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे.
देशात सध्या कांद्याच्या किमतीत खूप वाढ झाली असून ग्राहकांना खूप फटका बसत आहे. पूर्वीपेक्षा जास्त किमतीत ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागत आहे. अनेक भागात कांद्याच्या किमती 100 रुपयांवर पोहोचल्या आहेत. महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारकडून अनेक शहरांमध्ये स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून दिला जात आहे.
25 रुपये दराने कांदा खरेदी करता येणार
ग्राहकांना आता दिल्ली-एनसीआरमधील मदर डेअरीच्या सफाल विक्री केंद्रावर लोकांना 25 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करता येईल. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात असे म्हटले आहे की, या आठवड्याच्या अखेरीस सफाल मदर डेअरीमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री सुरू होणार आहे. खरिप पीक येण्यास विलंब होत आहे, त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत.
Government Schemes । ‘या’ लोकांची दिवाळी होणार गोड! मिळणार 4,500 रुपयांचा आर्थिक लाभ
दरम्यान, सरकारने चालू वर्षासाठी पाच लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवला असून दोन लाख टन अतिरिक्त बफर तयार करण्याची सरकारचा प्लॅन आहे. त्यामुळे कांद्याच्या घाऊक किंमतीत घसरण झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या आठवड्यापासून किरकोळ किमतीत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.