Onion Price । भाज्यांची चव वाढवणाऱ्या पदार्थातील पदार्थ म्हणजे कांदा. मागणी जास्त असल्याने दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु दरवर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. अनेकदा कांद्याचे भाव खूप पडतात. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकटही येते. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा शेतातच सडू द्यावा लागतो. यंदाही कांद्याचे दर (Onion Price Falls Down) चांगलेच पडले आहेत.
Red Chilli । लाल मिरचीची आवक वाढली! प्रतिक्विंटल मिळतोय तीन हजार ते साडेसहा हजारांचा दर
राज्यात पुन्हा एकदा कांद्याची चर्चा होऊ लागली आहे. कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर (Onion Rate) वाढू लागले होते. परंतु वाढते दर पाहता सरकारने त्यावर नियंत्रण मिळवले. खरंतर नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून सरकारनं तब्बल दोन लाख मॅट्रिक टन कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला असल्याचे तज्ञांचे मत आहे.
Government Subsidy । सोडू नका अशी संधी! कृषी यंत्रांवर मिळत आहे 50 टक्के अनुदान, आजच करा अर्ज
निम्म्याने दर कमी
नाशिक, सोलपूर जिल्ह्यांतदेखील कांद्याचे दर कमी झाले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने कांद्याचे दर कमी झाले आहे. आज या बाजार समितीत जवळपास साडेपाचशे गाडी कांद्याची आवक झाली आहे. येथे चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. मागच्या महिन्यात हे दर 60 ते 70 रुपयांवर होते. म्हणजे निम्म्याने दर कमी झालेत.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याची कमाल! पपईतून घेतले विक्रमी उत्पादन
शिवाय नाशिक बाजार समित्या दिवाळीमुळे एकूण 12 दिवस बंद होत्या. यानंतर मालेगाव, मनमाड आणि नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाला. कांद्याला पंधरा दिवसांपूर्वी सरासरी प्रति क्विंटल 3200 ते 3500 दर मिळत होता. या दरामध्ये क्विंटल मागे 300 ते 800 रुपये घसरण झाली असून कांद्याला प्रति क्विंटल 2600 ते 3200 दर मिळत आहे. तसेच विंचूरमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील केवळ पंधरा दिवसांत तब्बल 6 लाख 97 हजार क्विंटलची कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे.
Wheat Farming । शेतकऱ्यांनो, गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी द्यावे? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
शेतकरी अडचणीत
साहजिकच कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. सरकारने दरामधील घसरण रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. जर हे चित्र असेच कायम राहिले तर शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट येऊ शकते. दरवर्षी लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून आता कांद्याचे दर कमी झाले आहेत.